HOME   महत्वाच्या घडामोडी

भाजपाची दाढी हजामत बंद, अण्णा पुन्हा आंदोलनात, अंबोलीसाठी लागणार परवाना, २३ दिवसात खड्डेमुक्ती? आता मालमत्ता आधारशी लिंक.......२२ नोव्हेंबर २०१७


भाजपाची दाढी हजामत बंद, अण्णा पुन्हा आंदोलनात, अंबोलीसाठी लागणार परवाना, २३ दिवसात खड्डेमुक्ती? आता मालमत्ता आधारशी लिंक.......२२ नोव्हेंबर २०१७

* लातूर मनपा: ११ डिसेंबपर्पर्यंत घेता येतील मालमत्ता करावर आक्षेप, १३ डिसेंबरला अंतिम सुनावणी
* कोपर्डी प्रकरणाची सुनावणी आता २९ नोव्हेंबरला, याच दिवशी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता
* मुख्यमंत्री आणि अजित पवार एकाच विमानाने औरंगाबादेत, दोघे काय बोलले असतील? चर्चेला उधाण
* ट्वीटरवर मोदी यांची चहा विकण्यावरुन खिल्ली, सोशल मिडियावर टिकेचा भडीमार
* गुजरातेत पाटीदारांचा आरक्षणासाठी कॉंग्रेसला पाठिंबा
* चार राज्यांच्या निवडणुकांमुळे दहावीच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या परिक्षा लांबण्याची शक्यता
* महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत आज लातूर भेटीवर
* देवा शेतकर्‍याला सरसकट कर्जमाफी देण्याची बुध्दी मुख्यमंत्र्यांना दे- जनसंवाद यात्रेत शिवाजी पाटील कव्हेकर
* डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचा शनिवारी लातुरच्या आदर्श कॉलनीतील कम्युनिटी हॉल येथे सत्संग सोहळा
* बी फार्मसी परिक्षेचे केंद्र आता त्याच संबंधित महाविद्यालयात, विद्यार्थ्यांवरील ताण कमी
* एमआयडीसी ठाण्याच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी अकारण पोलिसांना बदनाम करु नका, सामाजिक संघटनांचे निवेदन
* लातुरच्या महसूल क्रीडा स्पर्धेत विजयानंतर जिल्हाधिकार्‍यांनी केले नृत्य
* कोपर्डी प्रकरणात आज फैसला, दोषींना सुनावली जाणार शिक्षा, न्यायालयाच्या परिसरात मोठा बंदोबस्त
* भ्रष्टाचार रोखण्यात मोदी सरकारला अपयश, पुन्हा जन आंदोलन उभारणार- अण्णा हजारे
* हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार मंत्रीमंडळाचा विस्तार
* लवकरच रेशनवर ५५ रुपये भावाने तूर डाळ मिळणार
* संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तिहेरी तलाकवर विधेयक मांडले जाणार
* मालमत्ताही आधारशी जोडण्याचा निर्णय लवकरच, बेनामी मालमत्ता उघड करण्याचा प्रयत्न
* भाजपचे मंत्री, आमदार, खासदार, नेते आणि कार्यकर्त्यांची दाढी कटिंग न करण्याचा यवतमाळमधील नाभिक संघटनेचा निर्णय
* नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, जळगावातून उडाण योजनेतून विमान सेवा सुरु होणार
* सोलापूर जिल्ह्यातील ऊसाचं आंदोलन तुर्तास स्थगित, एफआरपीपेक्षा मिळणार ४०० रुपये अधिक
* सर्व साखर कारखान्यांनी एफाआरपीपेक्षा ४०० रुपये अधिक द्यावेत, सहकार मंत्र्यांचे आदेश
* राम मंदिराला विरोध करण्यासाठी पाकिस्तानातून मिळते मदत, शिया वक्फ बोर्डाचा आरोप
* फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेऊ, डीएसकेंना पत्रकार परिषदेत कोसळले रडू
* शरद पवार, सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह ट्वीट करणार्‍या वालचंद गिट्टेला अटक
* सफाई कर्मचार्‍यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नागपूर मनपाने दिली जीपीएस तंत्राची घड्याळे
* जीएसटीचे दर आणखी होणार कमी, १८ आणि १२ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये होईल कपात
* वाढत्या गुन्हेगारीमुळे अंबोली घाटातील पर्यटनस्थळावर विना परवाना प्रवेश बंद
* १५ डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्याची घोषणा, उरले फक्त २३ दिवस, कसे होणार?
* गुजरात विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार, आज दिल्लीत घोषणा होण्याची शक्यता
* हैदराबाद येथील नारायणा कॉलेजमधल्या १६ वर्षांच्या विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
* बीटी कापसाचे बोंडअळीमुळे नुकसान, प्रति हेक्टर २५ हजार नुकसान भरपाई द्या- धनंजय मुंडे
* सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचा १२ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा
* नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरणी पाच जणांना अटक
* पाच वर्षापेक्षा अधिक काळ लेखा परिक्षण अहवाल सादर न करणाऱ्या पुणे विभागातील २९ हजार संस्थांना ठोकणार टाळे
* बुलेट ट्रेनला विरोध दुर्देवी- माधवराव चितळे, औरंगाबादेत चितळेंना गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान
* नारायण राणेंची कोंडी करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पोटनिवडणूक एकत्र लढविणार
* मुंबईतील कळवा भागात घरात घुसण्याचा बेतात असलेल्या चोराचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू
* मराठा समाजाच्या मूक मोर्चावर सामनात आक्षेपार्ह व्यंगचित्र, उद्धव ठाकरे, संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईना पुसद न्यायालयाचे समन्स
* पुढील वर्षांत राज्यसभेचे सहा खासदार आणि विधान परिषदेच्या २१ आमदारांची संपणार मुदत
* आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, राज्यमंत्री प्रवीण पोटे, माणिकराव ठाकरे, सुनील तटकरेंचा निवृत्त होणाऱ्यांमध्ये समावेश
* महाराष्ट्रीय तरुणाने बनविलेल्या भारतीय बनावटीच्या विमानाला १७ वर्षांनंतर विमान वाहतूक संचालनालयाची मान्यता
* नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर कॅप्टन अमोल यादवने बनविलेल्या सहा आसनी विमानाला मान्यता
* आत्महत्या न करण्याची दिल्लीत शेतकऱ्यांनी घेतली शपथ
* गुजरात निवडणूकः बसपा अध्यक्षा मायावती यांची राजकोटमध्ये ०५ डिसेंबर रोजी रॅली
* रामरहीमचा अत्यंत विश्वासू आणि पंचकुला हिंसाचारातील आरोपी पवन इन्साला पंजाबमधून अटक
* शौर्य पुरस्कारप्राप्त शहीद पत्नीने दुसऱ्या कोणाशीही लग्न केलं तरी भत्ता कायम राहणार
* पंतप्रधानांच्या रोड शोदरम्यान त्यांच्यावर कथित बांगड्या फेकणारी महिला चंद्रिका सोलंकीला काँग्रेसचं तिकीट मिळण्याची शक्यता
* 'इन्फोसिस'चे सहसंस्थापक नंदन नीलेकणी व रोहिणी नीलेकणी यांचा अर्धी संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करण्याचा निर्णय
* २६ लाखांसह बोगस सीबीआय अधिकाऱ्याला हैदराबाद विमानतळावर अटक
* नरेंद्र मोदी ब्रह्मदेव, संसदेचे हिवाळी अधिवेशन कधी होणार? हे फक्त त्यांनाच ठाऊक- काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे
* हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी गोविंद भाई श्रॉफ़ यांचा आज स्मृतीदिन
* ‘एस दुर्गा’ हा मल्याळम चित्रपट ‘इफ्फी’ त होणार प्रदर्शित
* बाल विवाह आणि महिला अत्याचाराच्या विरोधात लढणार्‍या डॉक्टर रखमाबाई यांचे १५३ च्या जयंतीनिमित्त गुगलकडून अभिवादन
* पाकिस्तान हा आमचा सार्वकालिक सामरिक भागीदार, पाकला सर्वाधिक प्राधान्य, महत्त्वाचे हितसंबंध जपण्यासाठी कायम पाठिंबा देणार- चीन


Comments

Top