HOME   महत्वाच्या घडामोडी

कोपर्डी: तिघांना फाशीच देण्याची मागणी, २९ तारखेला सुनावणी

फाशी नाही दिली तर समाजात चांगला संदेश जाईल का? उज्वल निकम यांचा सवाल


कोपर्डी: तिघांना फाशीच देण्याची मागणी, २९ तारखेला सुनावणी

अहमदनगर: कोपर्डी प्रकरणाती तिनही आरोपींना फाशीच द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केली. आज नगरच्या न्यायालयात यांनी युक्तीवाद केला. तिघांना फाशी दिली तर समाजात एकोपा होईल का? असा प्रश्न बचाव पक्षाने केला तेव्हा, फाशी नाही दिली तर समाजात चांगला संदेश जाईल का? असा प्रतिप्रश्न निकम यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी पुढची सुनावणी ठेवली आहे. याच दिवशी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार नसला तरी परिस्थितीजन्य पुरावे मात्र मजबूत आहेत. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे हे तीन आरोपी आहेत. कट रचून बलात्कार करणे, खून करणे हे त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी दोन तास युक्तीवाद केला. त्यानंतर उज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. तिघांनाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या तिनही गुन्हेगारांना फाशी होते की जन्मठेप ठोठावली जाते याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
कोपर्डी प्रकरणातील गुन्हेगारांना आजच शिक्षा होईल या अपेक्षेने कोपर्डीसह जिल्ह्यातील अनेक गावातून नागरिक न्यायालयात आले होते. पिडीतेचे आई-वडील आणि नातलगांचाही यात समावेश होता. निकाल ऐकण्यासाठी न्यायालयाच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती.


Comments

Top