HOME   महत्वाच्या घडामोडी

नोटाबंदीची किंमत चुकवणार, मुख्यमंत्र्यांनाही फसवलं, मोदींपेक्षा पटेल लोकप्रिय, गुगलनं शोधली फोनमधली चोरी, विमानात भरले हवेतच इंधन, गुळाचा जीएसटी वगळा......०१ डिसेंबर २०१७


नोटाबंदीची किंमत चुकवणार, मुख्यमंत्र्यांनाही फसवलं, मोदींपेक्षा पटेल लोकप्रिय, गुगलनं शोधली फोनमधली चोरी, विमानात भरले हवेतच इंधन, गुळाचा जीएसटी वगळा......०१ डिसेंबर २०१७

* लातुरच्या साई मार्गावर मध्यवर्ती कारागृहाजवळ ट्रक-रिक्षा अपघातात सातजण जखमी, सर्वोपचारमध्ये भरती
* मुंबईत कॉंग्रेस कार्यलयावर हल्ला, नुकसान भरपाई देण्याची अशोकराव चव्हाण यांची मागणी
* बीड: जयदत्त क्षिरसागर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांचं चहापान
* सहज म्हणून आम्ही चहा घेतला, त्याचा राजकीय अर्थ घेऊ नये- जयदत्त क्षिरसागर
* मनसे कार्यकर्त्यांनी केली मुंबई प्रदेश कॉंग्रेस कार्यालयाची तोडफोड, तिघांना अटक
* जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी उद्या लातुरात शिक्षकांचा मोर्चा
* शिरुर अनंतपाळ तालुक्यातील बेवनाळ येथे ऊसात लावलेला ६० हजारांचा गांजा जप्त
* रेणापूर, निलंगा आणि औशात राष्ट्रवादीने केले हल्लाबोल आंदोलन
* खरेदी केंद्रांवर शेतमाल नाकारताना शेतकर्‍यांना प्रतवारी प्रमाणपत्र द्यावे, पणन मंडळाची सूचना
* आ. सतीश चव्हाण यांनी लातुरच्या मनपा शाळेस विज्ञान साहित्यासाठी दिला ५० हजारांचा निधी
* नोटबंदी, जीएसटीची राजकीय किंमत चुकवण्यास तयार- पंतप्रधान मोदी
* मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आलेले १५१ चेक वटलेच नाहीत
* हाफीज सईदला पुन्हा अटक, आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तान नमले
* भाजपाच्याच लोकांनी आपलं नाव बिगर हिंदू म्हणून नोंदवले- राहूल गांधी
* गुजरातेत कॉंग्रेसची सत्ता आल्यास शेतकर्‍यांची कर्जमाफी करु- राहूल गांधी
* डीएसके यांनी तातडीने ५० कोटी न भरल्यास होणार अटक
* गुजरात निवडणूक: हार्दीक पटेल फेसबुकवर नरेंद्र मोदींपेक्षा ३०० टक्के अधिक लोकप्रिय
* कर्जमाफी योजना म्हणजे मोठा घोटाळा- सुप्रिया सुळे
* थर्ड डिग्रीचा वापर करणार्‍या पोलिसांना काढून टाका- रामदास आठवले
* दुधाचे दर कमी झाल्यानं सतेज पाटील यांनी काढला गोकुळवर मोर्चा
* भारतीय वायुदलानं केला हवेतच विमानात इंधन भरण्याचा यशस्वी प्रयोग
* महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे मंगळवार मध्यरात्रीपासून १२ विशेष लोकल
* विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मते फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन माघार न घेण्याचा काँग्रेसचा निर्णय
* निवडणुकीच्या काळात इतर पक्षातून आयात झालेल्या नेत्यांमुळे भाजप राज्यात आणि केंद्रात बनला पहिल्या क्रमांकाचा पक्ष- रावसाहेब दानवे
* औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे बूट गेले चोरीला
* दिल्लीत २३ मार्चच्या आंदोलनासाठी जागा देण्याची अण्णा हजारे यांची पंतप्रधानांकडे मागणी
* जीएसटीत गुळाचा ‘अकृषिक उत्पादन’ दर्जा वगळून कृषी उत्पादन करा- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत
* छगन भुजबळ यांच्या जामिनावर सुनावणी ०५ डिसेंबरला
* जीडीपी दरातील वाढ हे नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सुधारणेच्या धोरणाचे यश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* आधार कायद्याचे उल्लंघन भारती एअरटेलच्या चौकशीचे आदेश, कंपनीने ग्राहकांच्या संमतीविना एअरटेल पेमेंट बँकेची खाती उघडल्याचा आरोप
* नाशिक जिल्ह्यातला सीआयएसएफ जवानाने पत्नीसह सहकारी आणि त्याची पत्नी अशा तिघांची १६ गोळ्या झाडून केली हत्या
* तेरावर्षीय बलात्कारपीडित मुलीची गर्भपातासाठी उच्च न्यायालयात धाव, वैद्यकीय तपासणी अहवाल ०४ ‌डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश
* उडान योजनेअंतर्गत नांदेड-मुंबई-नांदेड विमानसेवा सुरू
* खाजगी व्यक्तींचा सामाजिक दर्जा लक्षात न घेता जिवाला धोका असल्याचा विचार करुनच पोलीस सुरक्षा देणार- राज्य सरकार
* मंत्रालयातील सचिव, प्रधान सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांची आज आणि उद्या खंडाळ्यात चिंतन बैठक
* मुंबईत खेळण्याच्या बंदुकीने बँक लुटण्याचा प्रयत्न करणारा बेकार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर गजाआड
* पुण्यामधील पाच आयटी पार्कसह राज्यात २५ नवीन आयटी पार्क सुरू
* तामिळनाडूच्या किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यात ०४ जणांचे बळी
* कांद्याचे दर स्थिर ठेवणे आमच्या हातात नाही- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान
* फेसबुक, वॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया अॅप्समधून माहितीची चोरी करणारं 'टीझी' हे अॅप गुगलनं काढलं शोधून
* फोनमधील कॉल रेकार्डसारख्या खाजगी माहितीची युजर्सच्या नकळत चोरी केली जाते ती पकडल्याचा गुगलचा दावा
* नरेंद्र मोदी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचा डीएनए एकच, दोघांनाही विज्ञान संशोधनाची आवड- विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन
* 'मोदी हे सच्चे हिंदू नाहीत'- कपिल सिब्बल
* कानपूरमध्ये हिंदी दैनिकाचा वार्ताहर नवीन श्रीवास्तव यांची गोळी झाडून हत्या
* भारताच्या मीराबाई चानूनं वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये विश्वविक्रम नोंदवून पटकावले सुवर्णपदक
* मध्य अटलांटिकात ०४.४ रिश्टर स्केलचा भूकंप, कोणतीही जीवित वा वित्तहानी नाही
* भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तिसरा कसोटी सामना होणार शनिवारी कोटलाच्या मैदानावर


Comments

Top