HOME   महत्वाच्या घडामोडी

राहुल गांधींचे वजन वाढले, ओखी गुजरातकडे, ठाकरे-पवारांचा सिन्हांना पाठिंबा, अण्णांची ३० पत्रे, मोदींना अहंकार, पतंजलीची सौर उर्जा......०६ डिसेंबर २०१७


राहुल गांधींचे वजन वाढले, ओखी गुजरातकडे, ठाकरे-पवारांचा सिन्हांना पाठिंबा, अण्णांची ३० पत्रे, मोदींना अहंकार, पतंजलीची सौर उर्जा......०६ डिसेंबर २०१७

* पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आज देणार पानगावला भेट
* ओखी वादळ सरकले गुजरातकडे, शाह आणि मोदींच्या सभा रद्द, मतदान मात्र ठरल्या वेळी
* ओखी वादळाचा महाराष्ट्रातला टळला धोका, कोकणकिनारपट्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान
* गुजरात विधानसभा निवडणूक: खराब हवामानामुळे राहुल गांधी यांच्या मोरबी, ध्रांगधरा आणि सुरेंद्रनगरमधील नियोजित सभा रद्द
* भुयार खोदून बडोदा बॅंकेत दरोडा घालणार्‍या ११ जणांना अटक
* ६२ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त लाखो आंबेडकर अनुयायी मुंबईत दाखल
* बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी जमलेल्या भीमसैनिकांसाठी मनपाच्या ७० शाळात सुविधा
* मुंबईत शिवाजी पार्कवर महापरिनिर्वाणदिनाच्या पुस्तिका प्रकाशनानंतर मंडप कोसळला, ०३ आंबेडकरी अनुयायी जखमी
* ओखी वादळामुळं द्राक्ष बागांचे मोठे नुकसान
* यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पाठिंबा
* महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी घेतली यशवंत सिन्हा यांची भेट
* महिला उद्योजकांसाठी राज्य सरकार करणार दोन हजार कोटींची गुंतवणूक
* राज्यात महिला उद्योगांची संख्या वाढविण्यासाठी २० लाख ते ०१ कोटीपर्यंत भांडवल अनुदान देण्याचा निर्णय
* मॉल्स, रेल्वे, बस स्थानके, विमानतळ, बाजार, व्यावसायिक केंद्र या ठिकाणी महिला उद्योगासाठी जागा आरक्षित ठेवणार
* शहजाद पुनावाला यांचे भाजप नेत्यांसोबत जवळचे संबंध, म्हणूनच करतात राहूल गांधींवर आरोप- कॉंग्रेस
* १० ते १२ डिसेंबर दरम्यान पुण्यात राष्ट्रीय किसान सभेचं आयोजन
* त्र्यंबकेश्वर नरबळी प्रकरणी ११ जणांना अटक
* हिवाळी अधिवेशन सभागृहातील चर्चेऐवजी विरोधकांच्या मोर्चामुळे बाहेर अधिक गाजण्याची शक्यता
* शेतकरी कर्जमाफीची सरकारची आकडेवारीवर खरी नाही, सेनेने जमा केलेल्या आकडेवारीशी सरकारची आकडेवारी ताडून पाहणार- शिवसेना
* सरकारने जनतेचा विश्वासघात केला, शेतकरी राजाही उद्ध्वस्त करण्याचे काम सरकारने केले- धनंजय मुंडे
* गुजरात विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची अनामत रक्कम वाचविण्याची चिंता आदित्य ठाकरे यांनी करावी- भाजपचे आशिष शेलार
* छगन भुजबळ यांना जामीन देण्यास ईडीचा विरोध
* स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या न देणाऱ्या उद्योगांच्या आर्थिक सवलती बंद करण्याचा निर्णय
* धोरणाची अंमलबजावणी करण्यास नकार देणाऱ्या उद्योजकांना होणार शिक्षा- उद्योगमंत्री सुभाष देसाई
* ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीला मुदतवाढ, तसेच दंडही माफ करावा- राज्य मंत्रालयाची मुंबई मनपाकडे विनंती
* खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मंत्रालयाला ०३ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा पालिकेचा निर्णय
* 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'चाच एक भाग असलेले 'षड्ज' आणि 'अंतरंग' कार्यक्रम १३ ते १५ डिसेंबर रोजी होणार पुण्यात
* सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : ज्येष्ठ तबलावादक पंडित नाना मुळे यांना 'वत्सलाबाई जोशी पुरस्कार' जाहीर
* पानसरे हत्येतील आरोपी वीरेंद्र तावडेचा जिल्हा कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल
* पंतप्रधान कार्यालयाला ३० पत्रे लिहिली पण त्यांचे उत्तर नाही, भ्रष्टाचार विरोधात २३ मार्चला दिल्लीत आंदोलन- अण्णा हजारे
* नरेंद्र मोदींना अहंकाराची बाधा तर झाली नाही ना, याची शहानिशा करायला पाहिजे- अण्णा हजारे
* बैलगाडा शर्यती : राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपिलावर सोमवारी सुनावणी
* बैलगाडा शर्यत सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुंबई हायकोर्टाची मनाई, आदेशाविरोधात राज्य सरकारचे अपील
* 'पतंजली' समुहाचा सौर उर्जेची निर्मिती करणाऱ्या उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय
* 'पतंजली'च्या निर्णयामुळे सौर उर्जेची उपकरणं तयार करणाऱ्या चिनी कंपन्यांचे दणाणले धाबे
* बँकिंग क्षेत्रात उतरलेली 'पेटीएम' नेट बँकिंग ऑनलाइन पेमेंटनंतर आता एटीएमची सुविधा देणार
* अयोध्या प्रकरणाची सुनावणी ०८ फेब्रुवारी २०१८ रोजी, सर्व पक्षकारांना कागदपत्रं जमा करण्याचे आदेश
* अयोध्या प्रकरण: सुप्रीम कोर्टाने आम्ही सांगितलेले मान्य केले- शिया बोर्डाचे वसीम रिझवी
* ०२ जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी पतियाळा हाऊस कोर्टात २१ डिसेंबरला निर्णय
* माझ्या स्वयंपाक घरात खाकरा, आचार, शेंगदाणे गुजराती, तुम्ही लोकांनी माझ्या सवयी बिघडवल्या, माझे वजन वाढत आहे- राहुल गांधी
* काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हे एकमेव अधिकृत उमेदवार- एम. रामचंद्रन, निवडणूक निर्णय अधिकारी
* रोहिंग्या प्रकरणातील याचिकेवरील सुनावणी ३१ जानेवारीपर्यंत * तहकूब
* फ्लिपकार्टच्या साइटवर 'गुगल पिक्सल २' मिळणार ३९ हजार ९९९ रुपयाला, २० हजारची होणार बचत
* भारत-पाक मैत्रीचा पुरस्कार करणारे सामाजिक कार्यकर्ते रझा खान यांचे लाहोरमधील घरातून अपहरण


Comments

Top