HOME   महत्वाच्या घडामोडी

शिक्षणमंत्र्यांचा लातूर दौरा रद्द, भन्साळीच्या शिरावर पाच कोटी, पाणी पातळी वाढली, पोलिस संरक्षणात ऊस वाहतूक, बाळासाहेबांचा स्मृतीदिन, पटेल राज्यमंत्री......१७ नोव्हेंबर २०१७


शिक्षणमंत्र्यांचा लातूर दौरा रद्द, भन्साळीच्या शिरावर पाच कोटी, पाणी पातळी वाढली, पोलिस संरक्षणात ऊस वाहतूक, बाळासाहेबांचा स्मृतीदिन, पटेल राज्यमंत्री......१७ नोव्हेंबर २०१७

* ‘पद्मावती’ चित्रपट पाहणार असाल तर आधी विमा काढून घ्या, राजपूत संघटनेचा इशारा
* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन २७२३, मूग ५५०० तर उडीद पोचले ४०७१ रुपयांवर (कमाल भाव)
* शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा आजचा लातूर दौरा रद्द
* मालमत्ता करवाढ: लातूर मनपाने घेतली ६५०० आक्षेपांवर सुनावणी
* पत्रकार कल्याण निधीच्या अशासकीय सदस्यपदी लातुरचे पत्रकार अशोक चिंचोले यांची निवड
* लातूर जिल्ह्यात सर्वे करुन जिल्हा अंधत्वमुक्त करु, जिल्हाधिकार्‍यांचा निर्धार
* जळकोट नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी उस्मान मोमीन यांची बिनविरोध निवड
* शेतीला पाणी देण्यासाठी गेलेले शेतकरी दयानंद डामगिरे गायब, शोध लागेना
* लातूर जिल्ह्याच्या पाणी पातळीत सरासरी २.१५ मीटरने वाढ
* शेतीची वीज तोडली तर अधिकार्‍यांना झोडपा, वलांडीत शेतकरी संघटनेचा मोर्चा
* पोलिसांनी शेतकर्‍याच्या छातीवर गोळ्या झाडायला नको होत्या, पायावर मारु शकले असते- रावसाहेब दानवे
* शेवगाव गोळीबारातील जखमी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख, गोळीबाराची चौकशी करु- रावसाहेब दानवे
* खासदार उदयनराजे भोसले आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी आज शेवगाव गोळीबारप्रकरणी शेतकऱ्यांशी करणार चर्चा
* सोलापूर जिल्ह्य़ात ऊसदराच्या आंदोलनामुळे काही ठिकाणी पोलीस संरक्षणात ऊस वाहतूक
* मी लठ्ठपणाचे उदाहरण, रोगाची जननी असलेल्या लठ्ठपणाविरोधात राज्यभर लवकरच मोहीम सुरू करणार- मुख्यमंत्री
* पुण्यातल्या दोन चित्रपटगृहांनी घेतला ‘दशक्रिया’ चित्रपट न दाखवण्याचा निर्णय
* अयोध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असताना चर्चेने काय साध्य होणार? योगी आदित्यनाथ यांचा प्रश्न
* नव्या हायपर लूप मार्गामुळे पुणे-मुंबई प्रवास होणार तीस मिनिटात, लवकरच कामाला सुरुवात
* सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अंबोलीत सापडले दोन मृतदेह, दोघे चुलत भाऊ बहीण
* औरंगाबादच्या छावणी परिसरात गॅस्ट्रोचे पाच हजार रुग्ण, दूषित पाणी स्रोतातून अजुनही पाणी पुरवठा सुरुच
* जीएसटी कमी झाला तरी अनेक हॉटेलातून तेवढेच बील
* राणेंनी लढवावी स्वत:च्या पक्षाकडून विधान परिषदेची निवडणूक, भाजपाची इच्छा
* भाजपाला राहूल गांधींची भिती वाटते, म्हणूनच बोफोर्स प्रकरण पुन्हा काढलं- शरद पवार
* ‘पद्मावती: संजय लीला भन्साळी यांचे शीर कापून आणणार्‍यास पाच कोटींचे बक्षीस-राजपूत संघटना
* आज बाळासाहेब ठाकरे यांचा पाचवा स्मृतीदिन
* राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना राज्यमंत्र्याचा दर्जा, सरकारने काढले आदेश
* कृषी पंपांचे वीज बील भरण्यासाठी सरकारने दिली १५ दिवसांची मुदतवाढ
* पश्चिम बंगाल दौर्‍यात अमिताभ बच्चन कार अपघातातून बचावले
* दिल्लीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मास्क लावणार्‍या दोघांना अटक
* येत्या एक डिसेंबरपासून घरबसल्या मोबाइल आधार क्रमांकाने जोडण्यासाठी वन टाइम पासवर्डचा उपयोग करता येणार
* पुढील वर्षापासून महाराष्ट्र व गोवा राज्यांतील ०१ हजार २९३ पोस्ट कार्यालयांतून मिळणार आधार कार्डे
* नोकरी सोडलेले, निवृत्त झालेल्यांना पीएफ खात्यातील रकमेवरील व्याजावर भरावा लागणार कर
* पंढरपूरजवळ कोरटीत ऊसदर आंदोलकांनी फोडली एसटी बस
* ११ डिसेंबरपर्यंत शेतकरी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास हिवाळी अधिवेशन चालूच देणार नाही- अजित पवार
* सातवा वेतन आयोग आणि अन्य प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास एसटी कामगार १० जानेवारीनंतर पुन्हा संपावर
* राज्यात ग्रामीण भागात डॉक्टरांना ‘ओव्हरटाइम’ मिळणार, ५०० डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेणार
* गृहप्रकल्पांतील घरांचा ताबा न दिल्याने डीएसके, भगतानी आणि टेम्पल रोझ ग्रुप बांधकाम कंपन्यांच्या मालमत्तांची होणार चौकशी
* नाशिकमध्ये राष्ट्रीय खेळाडू हर्षदा शिवकुमार माळवे पोलिस वाहनाच्या गंभीर जखमी
* सर्व कारखानदारांनी दर जाहीर करण्याची स्वाभिमानी संघटनेची अहमदनगरमध्ये मागणी
* खासदारांनी आपल्या मतदार संघात एक खादी भांडार सुरू करावे, आरक्षित जागा देऊ- मुख्यमंत्री
* संदीप पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ चित्रपट आज पुण्यात होणार प्रदर्शित, निर्मात्यांनी मागितले पोलिस संरक्षण
* राज्य उत्पादन शुल्क विभागातील खबऱ्यांना मिळणार ५० हजारापासून २० लाखापर्यंत बक्षीस
* मुंबई परिसरातील तिवरांच्या झाडांची कत्तल थांबवा, अन्यथा भविष्यात मुंबई ठाण्यासह परिसराचेही वाळवंट होईल- उच्च न्यायालय
* राज्यात ‘अंतरा’ या गर्भनिरोधक इंजेक्शनचा चार महिन्यात ०२ हजार २५९ महिलांनी केला वापर
* एसटी महामंडळाचे सुरु झाले कॉल सेंटर, प्रवाशांना प्रवासाची तक्रार, अपघाताची माहिती त्वरित देता येणार
* निवासी पत्ता होणार डिजिटल, तीन पिन कोड असलेल्या ठिकाणांवरील मालमत्तेला सहा अक्षरी डिजिटल पत्ता देणार
* आयसीआयसीआय पेटीएम ग्राहकांना देणार बिनव्याजी २० हजाराचे कर्ज
* पेटीएम कर्जधारकांनी ४५ दिवसानंतर परतफेड न केल्यास ५० रुपये विलंब शुल्क आणि ३ टक्के व्याज
* नरेंद्र मोदींना राफाल विमान खरेदी व्यवहार, अमित शहा यांच्या पुत्राविषयी प्रश्न का विचारत नाही?- राहुल गांधी
* जागावाटपात योग्य सन्मान दिला तर लोकसभा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडीस तयार- मायावती
* चीन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत


Comments

Top