HOME   महत्वाच्या घडामोडी

टायपिंगला मुदतवाढ, कव्हेकर विधानभेला उत्सुक, कोपर्डी प्रकरणात तिन्ही आरोपी दोषी, ठाकरे-सीएम चर्चा, भाजपच्या पोटात नथुराम, पुन्हा एसटी संपावर?, रजनीकांत मराठीत......१८ नोव्हेंबर २०१७

महत्वाच्या घडामोडी......


टायपिंगला मुदतवाढ, कव्हेकर विधानभेला उत्सुक, कोपर्डी प्रकरणात तिन्ही आरोपी दोषी, ठाकरे-सीएम चर्चा, भाजपच्या पोटात नथुराम, पुन्हा एसटी संपावर?, रजनीकांत मराठीत......१८ नोव्हेंबर २०१७

* चलबुर्ग्याजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात, सहाजण दगावले, १९ जणांवर लातुरात उपचार
* कोपर्डी प्रकरणात कसलाही सामाजिक दबाव आला नाही- अ‍ॅड. उज्वल निकम
* कोपर्डी प्रकरणात तिन्ही आरोपी दोषी, २२ नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा
* राज्यातील पहिले सोलार पार्क होणार होणार लातूर जिल्ह्यात- पालकमंत्री संभाजी पाटील
* लातूर शहर किंवा ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्यास तयार- शिवाजी पाटील कव्हेकर
* २० नोव्हेंबरपासून शिवाजी पाटील कव्हेकर यांची ग्रामीण भागात ‘जनसंवाद’ यात्रा
* लातुरच्या जातपडताळणी समितीवर पूर्णवेळ अध्यक्षांची नेमणूक करा, सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मंत्री राम शिंदे यांच्याकडे मागणी
* ‘जलयुक्त’ची कामे मार्च अखेर पूर्ण करा, जलसंधारणमंत्री राम शिंदे यांची लातुरात सूचना
* लातुरच्या जीवन विकास प्रतिष्ठानच्या संचालकपदी संजय निलेगावकर यांची निवड
* कोपर्डी प्रकरणाचा निकाल आज लागण्याची शक्यता, सबंध राज्याचे लक्ष
* पद्मावती चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर, गुजरात निवडणुकीनंतर शक्य, कागदपत्रे अपूर्ण असल्याचं सेन्सॉरचं सागणं
* वर्षभरात देशात १६ वाघांचा मत्यू ०९ वाघ मरण पावले चंद्रपुरात
* मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची महापौर निवासात बंद दाराआड चर्चा, राणे प्रकरण असू शकतो चर्चेचा विषय
* प्रदुषणामुळे दिल्ली दूषित, देशाची राजधानी नागपूरला हलवा- श्री श्री रवीशंकर
* श्री श्री रवीशंकर आज भेटणार सरसंघचालकांना, अयोध्या प्रश्नी चर्चा होण्याची शक्यता
* गुजरात विधानसभा निवडणुकीच्या भाजपाच्या पहिल्या यादीवर पटेलांचा प्रभाव, कॉंग्रेसमधून आलेल्या पाच जणांना संधी
* सोलापूर: सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर प्रहार संघटनेचं आंदोलन, अंगावर फोडून घेतल्या रक्ताच्या बाटल्या
* ऊसाला २७०० रुपये भाव देण्याची प्रहार संघटनेची मागणी, लोकमंगल कारखाना लक्ष्य
* मुंबईतील सरकारी कार्यालयातही सुरु होणार शिफ्टमध्ये काम
* नांदेड जिल्ह्यात गोविंद जायभाये या शेतकर्‍याने केली जाळून घेऊन आत्महत्या
* भाजपाच्या ओठात राम पण पोटात नथुराम- अजित पवार
* डीएसकेंना २३ नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश
* राज्यातील एसटी कर्मचारी पगारवाढीसाठी १४ डिसेंबरपासून संपावर जाण्याची शक्यता
* अभिनेता रजनीकांत आणि मामुटी झळकणार ‘पसायदान’ या मराठी चित्रपटात
* शिक्षकांची शाळाबाह्य कामे आठ दिवसात कमी करणार- शिक्षणमंत्री विनोद तावडे
* देशाची अर्थव्यवस्था बिकटच, कारखानदारी अडचणीत- शरद पवार
* चित्रप्रभू व्ही. शांताराम यांचा आज ११६ वा जन्मदिन, गुगलने टाकले डूडल
* अरुणाचल प्रदेशात पहाटे ४ वाजून १४ मिनिटांनी ६.४ तीव्रतेचा भूकंप, भारत-चीन सीमेवर भूकंपाचं केंद्रबिंदू
* पंजाबमधील रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बाबा रामरहिमची चौकशी सुरू
* काँग्रेस-पाटीदार आरक्षण समितीची आरक्षणाबाबतची चर्चा निष्फळ, हार्दिक पटेलने दिला काँग्रेसला २४ तासांचा अल्टिमेटम
* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सायंकाळी जाहीर सभा
* मुंबईतल्या ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलचे तोडले अनधिकृत बांधकाम
* मुंबईतील सर्व स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट होणर
* राज्यात टायपिंगला दोन वर्षांची मुदतवाढ, टायपिंग संस्थांना दिलासा
* यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथील आश्रमशाळेतील सात वर्षाच्या प्रदीप शेळकेचा खून वारंवार चिडवल्यामुळे केला- एका विद्यार्थ्यांची कबुली
* राज्यातील लघु, मध्यम व मोठय़ा धरणांची दोन वर्षांची १७०० कोटी पाणीपट्टीची थकबाकी
* डाळ निर्यातीवरील निर्बंध हटले, पण आंतरराष्ट्रीय बाजारात दर पडल्याने निर्यातीसाठी प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी
* मराठवाड्यातील ०१ हजार ५१८ गावांपैकी ९१५ गावात जलयुक्तची कामे अर्धवट, डिसेंबर अखेरची डेडलाइन झाली ३१ मार्च २०१८
* औरंगाबाद जिल्ह्यात १९६ तर नांदेड जिल्ह्यात १११ गावांमध्ये जलयुक्तची कामे शंभर टक्के पूर्ण, बाकी ठिकाणी निम्‍म्याही गावांत कामे नाहीत
* राज्यात डेंग्यूचे ०४ हजार ७९७ रुग्ण, २१ जणांचा बळी, चिकुनगुन्याचे संख्या झाली ८२०
* रावसाहेब दानवेंनी नोटबंदीत गैरमार्गाने नोटा बदलून घेतल्या, माझ्याही बदलून दिल्या, दानवेंची माझी नार्को करा- अब्दुल सत्तार
* उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या नावाखाली १५० खाजगी उद्योग व आयटी कंपन्यांना मुद्रांक शुल्कमाफी दिल्याची माहिती उघड
* १३ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन शहादा येथे २३ व २४ डिसेंबर रोजी
* बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी सेनेचे मुख्यमंत्री सहायता निधीला ०२ कोटी
* ३१ जानेवारी २०१८ रोजी मुंबईत चौथे अ. भा. शेतकरी साहित्य संमेलन, अध्यक्षस्थान डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार
* जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ऋषी कपूर देशद्रोही, वाराणसीत पोस्टर
* पत्नीला सांभाळू न शकणारे दुसऱ्यांची सीडी बनवत आहेत, मोदींचं नाव न घेता हार्दिक पटेलचा टोला
* शशिकला भ्रष्टाचार प्रकरणी जयललिता यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाचा छापा
* लष्कर ए तोयबात सामील झालेला काश्मिरी कॉलेज तरुण माजिद आर्शिद आईच्या आवाहनामुळे पोलिसांना शरण


Comments

Top