HOME   महत्वाच्या घडामोडी

ट्रकमुळेच चलबुर्गा अपघात, शेतकरी आज दिल्लीत, राहूल होणार अध्यक्ष, आधारची माहिती उघड, रविशंकरांचा खटाटोप, पाटीदार नाराज......२० नोव्हेंबर २०१७


ट्रकमुळेच चलबुर्गा अपघात, शेतकरी आज दिल्लीत, राहूल होणार अध्यक्ष, आधारची माहिती उघड, रविशंकरांचा खटाटोप, पाटीदार नाराज......२० नोव्हेंबर २०१७

* कोलकाता कसोटीत विराट कोहलीनं काढलं शतक, ३५२ धावांवर भारताचा डाव घोषित
* दिडशेहून अधिक शेतकरी संघटनांमार्फत हजारो शेतकरी जमले दिल्लीत, संपूर्ण कर्जमाफी आणि हमीभाव, सर्वांची एकच मागणी
* चलबुर्गा अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर, एसटी कर्मचार्‍यांनी केले रक्तदान
* चलबुर्गा अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना दहा लाख, जखमींचा खर्च एसटी उचलणार
* चलबुर्गा अपघाताला ट्रकचालक जबाबदार एसटी महामंडळाचा अहवाल
* आ. बसवराज पाटील यांनी घेतली जखमींची भेट, विचारपूस
* एकाच कुटुंबातील तीन मुलींवर बलात्कार करणार्‍या चंद्रकांत वागलगावेला चार दिवसांची पोलिस कोठडी
* ‘दशक्रिया’ चित्रपट लातुरात प्रदर्शित करा, लातुरच्या संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
* औशाचे शेतकरी महामार्गाचे काम बंद करणार, भूसंपादनाच्या मावेजाचा प्रश्न
* औसा तालुक्यातील कन्हेरी येथे संशयावरुन पत्नीचा गळा चिरुन कून, पती पोलिसात हजर
* पनगेश्वर कारखना ऊसाला देणार २२०० रुपयांची पहिली उचल
* औरंगाबादेत पत्नीपिडीत पुरुषांनी काढली रॅली, एकतर्फी कायदे रद्द करुन पुरुष आयोगाची स्थापना करा- मागणी
* हार्दीक पटेलच्या पाटीदार संघटनेचा कॉंग्रेसला पाठिंबा पण पहिल्या यादीत फक्त दोघांना उमेदवारी
* देशभरातील शेतकरी आज दिल्लीत; हमी भाव, कर्जमुक्ती, स्वामीनाथन अनेक मागण्या, १६२ संघटना एकत्र
* राजधानीत शेतकर्‍यांचं आंदोलन रामलिला मैदान ते संसदेपर्यंत
* गुजरात निवडणुकीआधी कॉंग्रेसचं अध्यक्षपद राहूल गांधींकडे, आज अखिल भारतीय कॉंग्रेसची बैठक
* ‘पद्मावती’ सिनेमाचं प्रदर्शन रखडलं, आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* २०० सरकारी वेबसाटसाईटकडून आधार कार्डांची माहिती उघड, केली सार्वजनिक
* संबधित वेबसाइटवरून आधारचा डेटा हटवण्यात आल्याचे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे स्पष्टीकरण
* भारताची चिल्लर झाली मिस वर्ल्ड, शशी थरुरांनी तोडले अकलेचे तारे, ट्वीट घेतले माघारी, महिला योग बजावणार नोटीस
* मुंबईत महिलांनी केला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात
* अनिकेत हत्येप्रकरणी झाली सांगलीच्या पोलिस प्रमुखांची चौकशी
* सातार्‍यात सापडली सात फूट लांबीची मगर
* पोलिस महासंचालकांनी बीडच्या महिला पोलिसाला लिंग बदलाची परवानगी नाकारली
* आठ दिवस सांगत बसलो तरी शेतकर्‍यांचे प्रश्न संपणार नाहीत- हिंगोलीत पाशा पटेल
* शेतीबाबत केंद्र सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचा- पाशा पटेल
* राज बब्बर यांची आज अमेठी व लखनौमध्ये रॅली
* मध्य प्रदेशात ०३ डिसेंबरपासून आपची संकल्प यात्रा
* गोवा येथे आजपासून ४८ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात, २८ नोव्हेंबरपर्यंत चालणार महोत्सव
* स्विस बँकांमधील भारतीयांच्या खात्यांची माहिती भारताला मिळण्यासाठी असलेल्या कराराला स्वित्झर्लंड संसद अर्थविषयक समितीची मंजुरी
* नोव्हेंबरपासूनच राम मंदिर मुद्दा निघतो, श्री श्री रविशंकरांच्या चर्चेमागे प्रसिद्धीसाठीचा खटाटोप - शिया पर्सनल लॉ बोर्ड
* फोनवरून जातिवाचक टिप्पणी किंवा शिवागाळ करणे हा गुन्हाच, त्यासाठी पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास- सर्वोच्च न्यायालय
* राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचे वेतन वरिष्ठ नोकरशहांपेक्षा कमी
* दहशतवादी प्रकरणांचा तपास करणारी राष्ट्रीय तपास संस्था आता करणार मानवी तस्करी प्रकरणांचा तपास
* ऊसदराच्या प्रश्नावर एकटा मार्ग काढू शकत नाही, शासन एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यास कारखानदारांना सांगू शकत नाही- सहकारमंत्री सुभाष देशमुख
* ऊसदरासाठी शेतकरी संघटनांचे आंदोलन चिघळले, 'स्वाभिमानी'च्या दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक, तोडगा निघाल्याशिवाय माघार नाही
* ‘होय, आम्ही फसवून दाखवले’ अशी जाहिरात सरकारने करावी- मनसे, हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेणार
* विकासात आपला अडसर वाटल्यानेच दूर ठेवले- एकनाथ खडसे चोपडा येथे आयोजित कार्यक्रमात
* डीएसकेच्याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील २७८ गुंतवणूकदारांनी दाखल केल्या तक्रारी
* शेवगाव गोळीबारची चौकशी करण्यासाठी श्रीरामपूर प्रांत अधिकार्‍यांची नियुक्ती
* 'पद्मावती' चे कलाकार, दिग्दर्शकाला जीवे मारण्याच्या धमक्या तर दुसरीकडे इफ्फीची जोरात तयारी म्हणजे सांस्कृतिक विनाश- शबाना आझमी
* धमक्यांविरोधात सर्व कलाकारांनी एकत्र येत ‘इफ्फी’वर बहिष्कार टाकावा- शबाना आझमींचे आवाहन
* प्रकल्पबाधितांसाठी भूसंपादन कायदेशीर प्रक्रिया न करता केल्याने मूळ जमीनधारकांना आजच्या बाजारभावाने राज्य सरकारला द्यावी लागणार किंमत
* घरात विनापरवाना अंतर्गत बदल केल्यास जावे लागणार तुरुंगात- मुंबई मनपा
* सेक्स व्हिडिओद्वारे आंदोलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र, व्हिडिओतील व्यक्तीला शोधतो- हार्दिक पटेल
* 'नोटाबंदीची नरेंद्र मोदींची संकल्पना चांगली पण अंमलबजावणी करताना झाली घोडचूक- अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ रिचर्ड थेलर
* आयएस या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी काश्मीरपर्यंत घुसले, जाकूरा येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आयएसने
* हार्दिकचे चार सेक्स व्हिडिओ व्हायरल झाल्याने पाटीदार समितीला जास्त तिकीटे देण्याबाबत काँग्रेसचा आखडला हात, चार जागा देण्याचा प्रस्ताव
* गुजरात विधानसभा निवडणूक: काँग्रेसची ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
* भोंदूबाबा उदयराज पांडेच्या उत्तर प्रदेशातील मूळ गावी पोलिसांचा छापा, २९ तोळे सोने, एक बुलेट, चारचाकी वाहन जप्त
* हार्दिकने भाजपला आव्हान दिल्यानेच कथित सेक्स सीडी जारी- जदचे लालूप्रसाद यादव
* ‘साबरमती के संत गीतातील ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग, बिना ढाल’ ओळीने क्रांतीकारकांचा अपमान- हरयाणा मंत्री अनिल विज
* क्वालालंपूर येथे अफगाणिस्तानने पाकिस्तानला १८५ धावांनी पराभूत करुन १९ वर्षांखालील मुलांच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे मिळवले विजेतेपद
* झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षपदावरून रॉबर्ट मुगाबेंना हटवले


Comments

Top