HOME   लातूर न्यूज

खाजगी शिकवण्या सुरु, वातावरण दहशतीचं

गल्लीत शुकशुकाट, लोक बोलत नव्हते, कुजबुजत होते!


खाजगी शिकवण्या सुरु, वातावरण दहशतीचं

लातूर: स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खुनामुळे काही दिवस बंद असलेल्या जवळपास सगळ्याच शिकवण्यांचे वर्ग सुरु झाले आहेत. २४ जूनच्या मध्यरात्री चव्हाण यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तेव्हापासून ३० जूनपर्यंत क्लासेस बंद राहिले. एक जुलै रोजी रविवारी काही क्लासेसनी वर्ग भरवणे सुरु केले. स्टेप बाय स्टेपची ११ वी आणि १२ वीची फ्रेश बॅच याच दिवशी सुरु होणार असे तेथील कर्मचार्‍यांनी सांगितले. रिपिटर्सची बॅच सात तारखेपासून सुरु होईल अशी माहिती मिळाली. या शिकवणी गल्लीत फेरफटका मारला तेव्हा शुकशुकाट होता. लोक बोलत नव्हते, कुजबुजत होते. दहशतही दिसत होती. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच आरोपींची कोठडी आज संपत असून त्यांना आज न्यायालयात उभे केले जाणार आहे. रविवारी या प्रकरणातील पिस्तूल ज्याच्याकडून घेण्यात आले त्या रमेश मुंडेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला काल न्यायालयात उभे करण्यात आले तेव्हा सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. खाजगी शिकवणी क्षेत्रातील गळेकापू स्पर्धा, कट प्रॅक्टीस, रोज नव्याने सुरु होणारे क्लासेस, प्रत्येक माध्यमातून होणार्‍या जाहिराती यामुळे या क्षेत्राची मोठी चर्चा होती. अगदी अल्पशिक्षित लोकही दोन चार प्राध्यापक कामाला ठेऊन क्लास सुरु करायचे यामुळे अनेकांना या क्षेत्रात नवी संधी दिसू लागली होती.


Comments

Top