HOME   लातूर न्यूज

हेलिकॉप्टर अपघात बाधिंताना आधीच मदत जाहीर- पालकमंत्री

बधितांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवीन घर प्रस्तावित


हेलिकॉप्टर अपघात बाधिंताना आधीच मदत जाहीर- पालकमंत्री

लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हयाच्या दौर्‍यावर असताना त्यांचे हेलिकॉप्टर निलंगा येथे कोसळले होते. त्यावेळी जे बाधित झाले होते त्यांच्यासाठी संबंधित उपाययोजना याआधीच करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी घेऊन निलंगा नगर पालिकेच्या निधीतून १ लाख ५० हजार खर्च करण्यात आला आहे. त्याच्या सफाई कामासाठी २० हजार आणि ३५ हजारांचा निधी घराच्या इतर कामासाठी व पुनर्वसन होईपर्यंत राहण्याची व्यवस्था निलंगा नगरपालिका टाऊन हॉलमध्ये केली होती असे राज्याचे कौशल्य विकास व कामगार मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. हेलिकॉप्टर दुर्घटनेत ज्या घरावर हेलिकॉप्टर कोसळले त्या बधितांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवीन घर प्रस्तावित आहे. संबंधित घर हे अतिक्रमित जागेत असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.


Comments

Top