HOME   लातूर न्यूज

फेब्रुवारी- मार्च मार्चमध्ये दहावीच्या परिक्षा

संभाव्य वेळापत्रक जाहीर, सोशल मिडियावरील वेळापत्रक ग्राह्य धरु नये


फेब्रुवारी- मार्च मार्चमध्ये दहावीच्या परिक्षा

लातूर: फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणा-या दहावीच्या परिक्षांचे स्म्भाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्ष्‍ा विषय ) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (पुनर्रचित व जुना अभ्यासक्रम ) लेखी परीक्षा कालावधी बुधवार २१
फेबु्वारी ते मंगळवार २० मार्च २०१८, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ०१ मार्च ते २४ मार्च २०१८. या कालावधीमध्ये आयोजित केलेले तारीखनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपुर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटसॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरु नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपुर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल. वेळापत्रकाबाबत काही सुचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात असे कळवण्यात आले आहे


Comments

Top