HOME   लातूर न्यूज

अवैध मुतारीच्या जागी वाचनकट्टा!

सामाजिक कार्यकर्त्यांनी केली स्वच्छता, सिमेंटचे बाकही बसणार


अवैध मुतारीच्या जागी वाचनकट्टा!

लातूर(आलानेप्र): लातुरचं गांधी चौक पोलिस ठाणं आणि पोस्ट ऑफीसच्या समोरील मुतारी, घाण हटवून या ठिकाणी विरंगुळा केंद्र तयार करण्याचा पॅटर्न आता लातुरात लोकप्रिय होऊ लागलाय. विलास गोंदकर आणि औसा हनुमान प्रतिष्ठान यांनी ही सुरुवात केली. त्याचं अनुकरण आता दयाराम मार्गावरही होत आहे. वाघमारे पॉवर लॉंड्रीसमोर मुक्कावार यांच्या जागेच्या कंपाऊंडलगत अनेक वर्षांपासून अनधिकृत मुतारी सुरु होती. याचा त्रास सगळ्यांनाच व्हायचा. आता त्या ठिकाणी वाचनकट्टा तयार होत आहे. आज नगरसेवक व्यंकट वाघमारे, यांच्या पुढाकाराने उदगीरकर फटाकेचे मालक जाकेरभाई पठाण, जानकी सेल्सचे पुरुषोत्तम देशमुख, योगेश हल्लाळे, सौरव शळके आणि टीम प्रभात मित्रमंडळ यांच्या सहकार्याने ही अस्वच्छ जागा स्वच्छ करुन घेतली. त्या ठिकाणी जंतूनाशक फवारण्यात आले. आता या जागी सिमेंटचे बाक बसवले जाणार आहेत. या उपक्रमाला ‘प्रभात कट्टा’ असे नाव दिले जाणार आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता या कट्ट्याचं लोकार्पण केलं जाणार आहे.


Comments

Top