HOME   लातूर न्यूज

जागतिक मधुमेह दिनानिमित्त रॅली, लातुरात प्रतिसाद


जागतिक मधुमेह दिनानिमित्त रॅली, लातुरात प्रतिसाद

जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून लातुरात असोसिएशन ऑफ फिजिशियन इंडिया व लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही रॅली लातूर शहरातील टाउन हॉल मैदानापासून जिल्हा क्रीडा संकुलापर्यंत काढण्यात आली. या रॅलीत आयएमए चे अध्यक्ष डॉ. अशोक आरदवाड, असोसिएशन ऑफ फिजिशियनचे सचिव डॉ. संगमेश चवंडा, डॉ. चंद्रशेखर आष्टेकर, डॉ. चांद पटेल, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. प्रेमकिशोर तोष्णीवाल, निमाचे अध्यक्ष डॉ. विनोद कोराळे, निमाचे सचिव डॉ. अभय जाधव, लातूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर बाहेती, सचिव नागेश स्वामी, व्यंकटेश कुर्डुकर, गजानन कुलकर्णी, अमित कुलकर्णी यांसह शहरातील अनेक मान्यवर व तज्ज्ञ डॉक्टर्स, केमिस्ट, वैद्यकीय प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. आजघडीला जगात मधुमेहाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मधुमेह होण्याची कारणे, त्यापासून रुग्णाने आपला बचाव कसा करायचा, त्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत रॅलीत सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुमेह विशेषज्ञ डॉ. संगमेश चवंडा यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या रॅलीच्या आयोजनामागची भूमिका सविस्तरपणे विशद केली. शेवटी डॉ. आर.एन.तोष्णीवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Comments

Top