HOME   लातूर न्यूज

शिवरायांना डोळ्यात साठवण्यासाठी जनसागर लोटला

महा रांगोळी पाहण्याची आजही संधी, प्रदर्शन सर्वांसाठी खुले


शिवरायांना डोळ्यात साठवण्यासाठी जनसागर लोटला

लातूर: जिल्हा क्रिडासंकुलाच्या मैदानावर अडीच एक्कर अर्थात एक लाख चौरस फुट जागेवर काढण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी पाहून महाराजांची ती छबी डोळ्यात साठवण्यासाठी जनसागर लोटला. लाखो शिवप्रेमी नागरिकांनी ही रांगोळी पाहण्यासाठी जिल्हा क्रिडासंकुलाच्या मैदानावर गर्दी केली. आ. दिलीपराव देशमुख यांच्यासह मान्यवरांनीही रांगोळी पाहण्यासाठी हजेरी लावली. शिवमहोत्सव समितीच्या वतीने मंगेश निपाणीकर यांच्या संकल्पनेतून ही रांगोळी साकारण्यात आली आहे. या रांगोळीसाठी पन्नास हजार किलो रांगोळी वापरण्यात आलेली आहे. ही रांगोळी विश्‍व विक्रमी ठरणार असून गिनीज बुक मध्ये नोंद होणार आहे. सोमवारी शिवजयंतीनिमित्त सकाळ पासूनच शिवभक्तांनी रांगोळी पाहण्यासाठी गर्दी केली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ०१ लाख नागरीक व महिलांनी ही रांगोळी आपल्या डोळ्यात साठवून घेतली. अशीच गर्दी दुसर्‍या दिवशीही होती. आज २१ तारखेला ही रांगोळी पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.


Comments

Top