HOME   लातूर न्यूज

’असिफ़ा’ ला न्याय द्या, लातुरात मानवी साखळी


’असिफ़ा’ ला न्याय द्या, लातुरात मानवी साखळी

लातूर: कठुआ आणि उन्नाव येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींना फ़ाशीची शिक्षा द्या, असिफ़ाला न्याय द्या, कुठे गेले बेटी बचाव अभियान? घटनेतील पीडितांना कधी न्याय मिळेल? असे फ़लक झळकावून लातूरात मानवी साखळीने दोन्ही घटनांचा निषेध केला. लातूर येथील गांधी चौकात ’आम्ही भारतीय ग्रुप’ च्या वतीने उन्नाव व कठुआ घटनेच्या निषेधासाठी मानवी साखळी करण्यात आली. गांधी चौकातून कॉंग्रेस भवन, पोलीस स्टेशन, मिनी मार्केट चौकापर्यंत दुतर्फ़ा नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. तसेच महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासभोवती लहान मुलांनी निषेधाचे फ़लक हातात घेऊन मानवी साखळीत साहभाग घेतला. दरम्यान, महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने गंजगोलाई येथून गांधी चौकापर्यंत कॅंडल मार्च काढला. ’असिफ़ा’ला न्याय द्यावा, घटनेतील अरोपींना पाठबळ देणार्‍यांचा निषेधही यावेळी करण्यात आला. मानवी साखळीत विविध सामाजिक संघटना, संस्था, राजकीय पक्षांचे कार्य्कर्ते सहभागी झाले होते. यावेळी माधव बावगे, अ‍ॅड. गोविंद सिरसाट, अ‍ॅड. उदय गवारे, आरेफ़ सिद्दिकी, योगिराज हल्लाळे, रफ़िक सय्यद, अफ़जल कुरेशी, कलीम पटेल, मोहसीन खान, बरकत काझी, दादा राठोड, एम.आय.शेख, जावेद मणियार, कलीम तांबोळी, हमीद खान, बशीर शेख, गौस सय्यद, वाजीद मणियार, मुनीर शेख, योगेश शर्मा, सत्तार शेख, संतोष साबदे, अ‍ॅड. रामगोविंद गुणाले, उमेश कांबळे, अन्वर शेख, इम्रान पठाण, अजहर घावटी, सलीम शेख, अ‍ॅड. किसन शिंदे, राम गोरड, अ‍ॅड. आर. झेड. हाश्मी, महंमद देशमुख, सोहेल काझी, अमोल स्वामी, टिल्लू शेख, नितीन देशमुख, जकीखान कायमखानी, भास्कर माने, रणजीत आचार्य, आदीजण सहभागी होते. यावेळी कठुआ उन्नाव येथील अत्याचार प्रकरणातील अरोपींच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारून नागरिकांनी निषेध व्यक्त केला, प्रस्ताविक प्रा. डॉ. फ़ारुक तांबोळी यांनी केले तर हमीद शेख यांनी आभार मानले.


Comments

Top