HOME   लातूर न्यूज

शहराच्या विकासात व्यापार्‍यांचा मोठा वाटा- जिल्हाधिकारी


शहराच्या विकासात व्यापार्‍यांचा मोठा वाटा- जिल्हाधिकारी

लातूर: व्यापार, उद्योगाचा शहारांच्या विकासात मोठा वाटा आहे. एवढेच नव्हे तर यामुळे रोजगार निर्माण होवून तरूणांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळते, असे मत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी येथे बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्काराने जी. श्रीकांत यांना नुकतेच सन्मानीत करण्यात आले. त्यानिमित्त लातूर व्यापारी महासंघाच्यावतीने येथील औषधी भवनात त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी, सचिव मनीष बंडेवार यांची उपस्थिती होती. व्यापार व उद्योगातून शहराला महसूल मिळतो व त्यातून शहराच्या विकासाला गती मिळते. त्याचबरोबर रोजगारही उपलब्ध होतो. त्यामुळे हे क्षेत्र वृद्धींगत झाले पाहिजे, असे नमूद करून जिल्हाधिकारी म्हणाले की, लातुरात येऊन एक वर्ष झाले. येथील राजकीय संस्कृती उत्तम आहे. विकासाच्या मुद्यावर सर्व राजकीय नेते एकत्र येवून साथ देतात. त्यामुळे मला येथे काम करताना कसल्याही अडचणी आल्या नसल्याचे ते म्हणाले. लातूर महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी प्रशासन आणि व्यापारी यांच्यात समन्वय असण्याची गरज असून त्यातून प्रश्न मार्गी लागतात असे मत व्यक्त केले. अरविंद पाटील निलंगेकर यांनी मनोगत व्यक्त करून जी. श्रीकांत यांना शुभेच्छा दिल्या. महासंघाचे सचिव मनीष बंडेवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास भोसले यांनी केले. कार्यक्रमास व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top