HOME   लातूर न्यूज

हासेगावच्या सेवालयात वसुंधराकडून वृक्षारोपण

सेवालयात लावली पर्यावरणपूरक उंच झाडे


हासेगावच्या सेवालयात वसुंधराकडून वृक्षारोपण

लातूर: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने हासेगाव येथील सेवालयात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी ०५ ते ०६ फूट उंचीचे पर्यावरणपूरक २५ वृक्ष लावण्यात आले. हासेगावच्या सेवालय परिसरात श्रमदान करून खड्डे खोदण्यात आले. वड, पिंपळ, गुलमोहर, मोहगणी, नांदूरकी आदी पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांचे संगोपन करण्याची हमी सेवालयाने दिली आहे. या वृक्षारोपण मोहिमेत सेवालयप्रमुख प्रा. रवी बापटले, प्रा. छगनराव शिंदे, वसुंधरा प्रतिष्ठानचे अमर साखरे, अजय साठे, श्रीकांत क्षीरसागर, नागेश जाधव, उमाकांत मुंडलिक, नागनाथ भंडारकोटे, रामेश्वर बावळे, बालाजी केदार, रामदास घार, वैभव गडकरी, अभिजित कोरनुळे आदींनी सहभाग घेतला. वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली असून या अंतर्गत लातूर जिल्ह्यात सुमारे २२ हजार वृक्षांची लागवड स्वखर्चातून करण्यात आली आहे. १८ ते १९ हजार वृक्षांचे यशस्वी संगोपन करण्यात आले आहे. यासाठी ट्री बँक, वृक्षांचे वाढदिवस, निसर्गाशी मैत्री अभियान, वाढदिवस वृक्ष भेट, पर्यावरण पूरक सण-उत्सव आदी उपक्रम राबविण्यात आले, अशी माहिती वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रमुख प्रा. योगेश शर्मा यांनी दिली.


Comments

Top