HOME   लातूर न्यूज

मुरुड ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदी आकाश कणसे

विरोधकांनी ठेवला मतांवर ताबा पण नाडे गटाचे एक मत झाले बाद


मुरुड ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदी आकाश कणसे

मुरुड: मुरुड ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदी आकाश कणसे यांची निवड करण्यात आली. विरोधकांनी आपापल्या मतांवर नियंत्रण ठेवले पण दिलीप नाडे गटाचे एक मत अवैध ठरले. सरपंचपदासाठी ०९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सरपंच आणि सदस्यांच्या निवडणुकीत नाडे गटाला १३ जागा मिळाल्या तर विरोधी गटाने ०४ जागा प्राप्त केल्या. सरपंचपदी अभयसिंह नाडे निवडून आले. उप सरपंच निवडीसाठी नूतन सदस्यांची बैठक झाली. नाडे गटातर्फे आकाश कणसे, तर विरोधी गटातर्फे संतोष काळे यांनी अर्ज दाखल केले होते. अमर नाडे यांनी गुप्त मतदानाची मागणी केली. त्या पद्धतीने झालेल्या मतदानात आकाश कणसे यांना १२ तर संतोष काळे यांना चार मते पडली. एक मत बाद झाले. निवडणूक निर्णय अधिकारी आरएन साचणे यांनी आकाश कणसे यांना विजयी घोषित केले. यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. मुरुड ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच तरुण चेहरे सरपंच आणि उप सरपंच पदे भूषवत आहेत. कणसे परिवाराने पहिल्यापासूनच दिलीप नाडे यांना साथ दिली आहे. तरुण चेहर्‍यांच्या माध्यमातून गावाला वेगळी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Comments

Top