HOME   लातूर न्यूज

लातुरचं रोपटं नाना पाटेकर लावणार स्वत:च्या शेतात!


लातुरचं रोपटं नाना पाटेकर लावणार स्वत:च्या शेतात!

लातूर: काल अभिनेते आणि संवेदनशील कार्यकर्ता नाना पाटेकर लातुरात आले होते. यावेळी लातूर वृक्षच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन एक रोपटं त्यांना भेट दिलं. हे रोपटं आपण आपल्या शेतात लावू असं नाना पाटेकरांनी सांगितलं. यावेळी वृक्ष, पर्यावरणातील बदलाचा मराठवाड्यातील वातावरणावर होणारा परिणाम, मराठवाड्यातील ग्रीन कव्हर यावर चर्चा झाली.
लातूर वृक्षचे सुपर्ण जगताप, संजय ओव्हळ, डॉ पवन लड्डा, इम्रान सय्यद, संजय राजुळे, महेश बिडवे, विश्वनाथ खंदाडे, विकास चामे, रितेश बिसेन, अमृत सोनवणे, डॉ रमेश भराटे, श्रीकांत कर्वा, भास्कर बोरगावकर, हेमंत रामढवे, कृष्णकुमार बांगड, वैभव, शुभम, कल्पना, नीलम जाधव, स्मिता थडकर, प्राजक्ता भोसले, भीमाशंकर झुंजारे, धनंजय राऊत, जयदेव मोहिते, नितिन देशमुख, विशाल थोरमोटे उपस्थित होते. लातूर परिसरातील आजुबाजुच्या ३० गावात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन उपक्रम येणार्‍या पावसाळ्यापासून राबविला जाणार आहे याचीही माहिती पाटेकरांना देण्यात आली.


Comments

Top