HOME   लातूर न्यूज

मुंबई व लातुरातील प्रभाग ०५ मध्‍ये प्‍लास्‍टीक प्रक्रिया प्रकल्प

शासनाची प्रायोगिक मंजुरी, विक्रांत गोजमगुंडे यांच्‍या स्‍वच्‍छता उपक्रमांची शासनाने घेतली दखल


मुंबई व लातुरातील प्रभाग ०५ मध्‍ये प्‍लास्‍टीक प्रक्रिया प्रकल्प

लातूर: वाढत्‍या लोकसंख्येमुळे व प्‍लास्‍टीकच्‍या अती वापरामुळे शहरांच्‍या घनकचरा व्‍यवस्‍थापनात सर्वाधिक डोकुदुखी ठरणा-या प्‍लास्‍टीकरवर राज्‍य शासनाने बंदी घातली आहे. परंतू यापूर्वी निर्मीत व वापरात आलेल्‍या प्‍लास्‍टीकची विल्‍हेवाट लावणे ही राज्‍यातील मनपासमोर असणारी सर्वात मोठी समस्‍या आहे. लातूरातील उपक्रमशील नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी मागील काळात आपल्‍या प्रभागात स्‍वच्‍छतेचे विविध उपक्रम रा‍बविले. त्‍यांनी मराठवाडयातील ओला कच-यापासून खत निर्मीतीचा पहिला प्रकल्‍प उभारत यशस्‍वी करून दाखविला. तसेच टाकाऊ प्‍लास्‍टीकपासून डांबरी रस्‍ता विकसित करून प्‍लास्‍टीकची विल्‍हेवाट लावण्‍याचा नवीन पर्याय उपलब्‍ध करून दिला. आजवर त्‍यांच्‍या प्रभागातील या अभिनव उपक्रमांना राज्‍यातील अनेक उच्‍चपदस्‍थ अधिकारी, मनपा नगरपरीषदांचे पदाधिकारी यांनी भेटी देवून पाहणी केली. नुकतीच राज्‍य शासनाने प्‍लास्‍टीककवर बंदी घातली व राज्‍यातील प्‍लास्‍टीक उत्‍पादकांनी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या सहाय्याने प्‍लास्‍टीक कच-याची विल्‍हेवाट लावून प्रायोगीक तत्‍वावर त्‍यावर प्रकिया प्रकल्‍प उभारण्‍याचा निर्णय घेतला व त्‍याकरीता मुंबई येथील १० प्रभाग व लातूर मधील प्रभाग ०५ ची नविड केली आहे. शासन निर्णयानुसार प्‍लास्‍टीक मैन्‍युफॅक्चर्स असोशिएशन लातूरातील प्रभाग ०५ मध्‍ये प्‍लास्‍टीक वरील प्रक्रिया प्रकल्‍प उभारणार असून त्यावरचा खर्चही उचलाणार आहे. नुकतीच महाराष्‍ट्र प्‍लास्‍टीक मॅन्‍युफॅक्चरर्स असोशिएशनचे अध्‍यक्ष रवी कसणानी, सचिव प्रमोद शहा, निखील राठी, नितीन पटवा यांच्‍या शिष्‍टमंडळाने लातूर येथे येवून प्रभाग ०५ मधील स्‍वच्‍छता उपक्रमांना भेट दिली. तसेच मनपा आयुक्‍त कौस्‍तुभ दिवेगावकर यांच्‍याशी चर्चा केली. प्रभाग ०५ मधील या प्रकल्‍पाची उभारणी लवकरच केली जाणार आहे. प्रभागाचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी या शिष्‍टमंडळाची भेट घेवून त्‍यांना स्‍वच्‍छता उपक्रमांची माहीती दिली व उभारण्‍यात येणा-या प्रकल्‍पाबाबत चर्चा केली. प्‍लास्‍टीक वरील पुनर्प्रक्रियचा प्रकल्‍प महाराष्‍ट्रात मुंबई नंतर लातूर मधील प्रभाग ०५ मध्‍ये उभारला जाणे ही अभिमानाची बाब असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले. यावेळी जनाधार संस्‍थेचे संजय कांबळे, सुभाष पंचाक्षरी, स्‍वच्‍छता निरीक्षक मुनीर शेख, अकबर शेख, आशिष साठे, महादेव धावारे, रेवण काडोडे, सुर्यकांत काळे, सुनिता उबाळे इत्‍यादी उपस्थित होते.


Comments

Top