HOME   लातूर न्यूज

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

हमीभाव नाही, व्यापार ठप्प, जखमेवर मीठ चोळण्याचा सरकारचा प्रयत्न


पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

लातूर: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची ऐतिहासीक दरवाढ करून सर्वसामान्यांचे जगणे महाग करून ठेवले आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध व्यक्त करून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ तात्काळ रद्द करावी यासाठी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौक, लातूर येथे निदर्शने करण्यात आली. सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने सर्व सामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. शेतकरी, व्यापारी, बेरोजगार तरूण व इतर समाज घटक या सरकारवर समाधानी नाहीत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नास हमीभाव नाही, व्यापार ठप्प झाला आहे अशा अडचणीच्या काळातच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ करून सर्व सामान्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करून झालेली दरवाढ तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरूवार रोजी गांधी चौक, लातूर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात केंद्र सरकार - महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल - डिझेल दरवाढ रद्द करा अशा घोषणा देऊन निष्क्रीय सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईज शेख, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाट, खाजाबानू अन्सारी, लक्ष्मीबाई बटनपूरकर, कल्पना मोरे, सुलेखा कारेपूरकर, सुरेखा गिरी, प्रा.सुधीर अनवले, नगरसेवक कैलास कांबळे, सचिन बंडापल्ले, फारूख शेख, रफीक सय्यद, प्रविण घोटाळे, प्रविण पाटील, महेश काळे, अॅड.खुशालराव सुर्यवंशी, मारोती बनाटे, अल्ताफ शेख, अॅड.देविदास बोरूळे पाटील, युसूफ बाटलीवाला, रघुनाथ मदने, सिकंदर पटेल, अविनाश बट्टेवार, अॅड.प्रदिप गंगणे, अॅड.दिनेश रायकोडे, तबरेज तांबोळी, शरद देशमुख, मुहमद खान, निखील लोकरे, सुरज राजे, कुणाल शृंगारे, अॅड. किशन शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.


Comments

Top