HOME   लातूर न्यूज

हडियालचा मृत्यू अ‍ॅसिड पिल्याने- चिरंजीव प्रसाद

न्यायालयाकडूनही चौकशी सुरु, हडियालचा भाऊ काय सांगतो पोलिसांनी घेतले २५ लाख


हडियालचा मृत्यू अ‍ॅसिड पिल्याने- चिरंजीव प्रसाद

लातूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोडयाच्या प्रकरणातील मेहसाना गुजरात येथील आरोपी नरेंद्रसिंह हाडियाल याचा १५ ऑक्टोबर रोजी कोठडी भोगत असताना मुत्यू झाला. हडियालने टॉयलेट क्लीन ॲसिड पिऊन आत्महत्या केली. पोलीसांनी त्याला मारहाण केलेली नाही. आरोपीकडे टॉयलेट क्लीन ॲसिड कसे गेले याची चौकशी चालू आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. केसचा पुढील तपास सीआयडी क्राईमकडे आहे. या केसमध्ये मानवाधिकारा संबंधी सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे, असा खुलासा नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक चिंरजीव प्रसाद यांनी केला आहे.
नरेंद्रसिंगकडे हवालाचे कोटींवर पैसे होते, त्यावर डल्ला मारला गेला. हडियाल मरण पावल्यावर त्याचे भाऊ हिम्मतसिंगला नरेंद्रला हर्ट अटॅक आल्याचे सांगण्यात आले. दोघांचे बोलणेही होऊ शकले नाही. एमआयडीसी पोलिसांनी वारंवार पैशांची मागणी केली. आपणाकडून २५ लाख रुपये घेतले गेले असं हिम्मतसिंग सांगतात. त्यांनी या संदर्भात जे दावे केले आहेत त्याला पुष्टी देणारे सीसीटीव्ही फुटेजही माध्यमांना दाखवले. या प्रकरणी उच्च न्यायालयात प्रकरण दाखल असून २७ नोव्हेंबर रोजी याची सुनावणी होणार आहे. लातूर न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेतली असून न्यायालयाकडूनही स्वतंत्र चौकशी सुरु आहे अशी माहिती अ‍ॅड. भूपेंद्र चव्हाण यांनी दिली.


Comments

Top