HOME   लातूर न्यूज

खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर

संसदरत्न पुरस्कार मिळणारे डॉ. सुनील गायकवाड हे लातूरचे पहिलेच खासदार


खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर

लातूर: खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना २०१८ चा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याचे वितरण बुधवार, २० रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहराज्य मंत्री डॉ. हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार आहे. संसदरत्न पुरस्कार मिळणारे डॉ. सुनील गायकवाड हे लातूरचे पहिलेच खासदार ठरले आहेत.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेल्या खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी आजपर्यंतच्या केवळ चार वर्षांच्या कालावधीत लातूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी आणला. केंद्र सरकारकडून १६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सुपरस्पेशालिटी रुग्णालय आणले. जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी भरघोस निधी आणला, संसदेच्या अधिवेशन काळात १०० टक्के उपस्थिती लावून प्रत्येक चर्चेत सहभाग नोंदवला, देश पातळीवरील व मतदारसंघातील अनेक प्रश्‍न अधिवेशनात मांडून त्यांची सोडवणूक करून घेतली. यासह दक्षिण अमेरिकेत झालेल्या माहितीतंत्रज्ञानच्या जागतिक परिषदेत डॉ. सुनील गायकवाड यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करून आयटी विभागात सुरू असलेले भारताचे काम जगाच्या निदर्शनास आणून दिले. भूतानच्या अभ्यास दौर्‍यातही त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करून उपस्थित जगभरातील खासदारांची मने जिंकली. डॉ. सुनील गायकवाड यांच्या कामामुळे त्यांना आजपर्यंत बांग्लादेशचा लॉर्ड बुध्दा आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय शांतता पुरस्कार, भारत ज्योती पुरस्कारांसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन दिल्ली येथील सांसदरत्न पुरस्कार ऍवार्ड समितीने २०१८ च्या संसदरत्न पुरस्कारसाठी डॉ. सुनील गायकवाड यांची निवड केली आहे. या निवडीचे पत्र डॉ. गायकवाड यांना भारत गौरव अवॉर्ड समितीचे संदेश यादव यांच्याकडून रविवारी प्राप्त झाले आहे. या पुरस्काराचे वितरण बुधवार, २० रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्ली येथील कॉन्ट्यूशनल क्लब येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री डॉ. हंसराज अहीर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार तथा भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, खासदार राजेशकुमार दिवाकर, खासदार ओमप्रकाश यादव यांची उपस्थिती राहणार आहे असे खासदारांच्या कार्यालयातून आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


Comments

Top