HOME   लातूर न्यूज

गानतारा नंदीनी, अंजली गायकवाड लातुरात

गुरूप्रसाद म्युजिक अकॅडमीचा लातुरात २३ तारखेला अंतरंगीचे नादविश्व कार्यक्रम


गानतारा नंदीनी, अंजली गायकवाड लातुरात

लातूर: गंजगोलाई येथील श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील दयानंद सभागृहात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता गुरूप्रसाद म्युजिक
अकॅडमीच्या अंतरंगीचे नादविश्व हा भारदार गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अंतरंगीचे नादविश्व या कार्यक्रमात भक्तिगीत, भावगीत, नाट्यगीत आणि हिंदी, मराठी चित्रपटातील गीतांचा भारदार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सारेगमा लिटल चॅम्प झीयुवा संगित सम्राट विजेत्या बालगायिका कु. नंदिनी व कु. अंजली गायकवाड तसेच अंगद गायकवाड व सारेगमपफेम योगेश रणमले यांचा दर्जेदार वाद्यवृंद्यासह भारदस्त गितांचा कार्यक्रम होणार आहे. हा गितांचा कार्यक्रम पूर्णपणे मोफत आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.


Comments

Top