HOME   टॉप स्टोरी

प्लास्टीकबंदीला तयार पण पर्याय द्या

लातुरच्या व्यापार्‍यांची मागणी, कोट्यवधींवर पाणी कसं सोडायचं?


लातूर: मागच्या अनेक वर्षांपासून प्लास्टीक बंदीचा गवगवा सुरु आहे. आज अखेर ती लागू झाली. प्लास्टीकच्या वापरामुळे पर्यावरणाचा मोठा र्‍हास होत आहे, मुक्या जनावरांचे बळी जात आहेत, शहरातील गटारी तुंबून पाणी रस्त्यावर येत आहे. समुद्र, नदी, नाल्यातून प्लास्टीकचा कचरा डोकेदुखी बनला आहे. आधी पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती. आता सर्वच जाडीच्या पिशव्या विकण्यास मनाई झाली आहे. या निमित्ताने प्लास्टीक विक्रेत्यांचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आजलातूरने केला. सगळ्या व्यापार्‍यांनी एकच उत्तर दिलं. प्लास्टीक बंदी मान्य आहे पण आम्हाला-आमच्या व्यवसायाला पर्याय द्या!
प्लास्टीक विक्रेता संघाचे अध्यक्ष गोपाल हरियाणी यांच्या उपस्थितीत प्रमुख प्लास्टीक व्यापारी जमले. प्रत्यकाने आपापल्या व्यथा सांगितल्या. संअज्य पंपटवार म्हणाले आज माझ्याकडे लाखोंचा माल पडून आहे. कंपनी परत घेत नाही, दुसरा कुणी विकत घेत नाही, फेकून देता येत नाही आणि जाळताही येत नाही! दुसरे व्यापारी म्हणाले बॅंकेचं कर्ज काढून माल खरेदी केलाय आता परतफेड कशी करायची? एक छोटा व्यापारी म्हणाला दोन लाखात प्लॉट विकला, तीन लाखांचं कर्ज घेतलं. आता जलबीन मछली अशी अवस्था झाली आहे. २५ वर्षापासून या व्यवसायात आहे. अचानक नोटाबंदी झाली पण पर्याय मिळाला. तसं प्लास्टीक बंदीचं नाही. मल्टी नॅशनल कंपन्यांना सूट दिली जाते पण छोट्या व्यापार्‍यांना वेठीस धरलं जातं असाही आरोप करण्यात आला. आता बॅंकांची कर्जे कशी फेडायची हा खरा प्रश्न आहे ही चिंता सर्वांनी बोलून दाखवली.


Comments

Top