HOME   टॉप स्टोरी

अष्टविनायक शाळेला कुलूप, पालकांनी तोडले, विद्यार्थी उघड्यावर

आरक्षित जागेवरील शाळा हटवण्याचे दिले होते आदेश, काल रात्री घातले कुलूप!


लातूर: लातुरच्या शिवाजीनगर भागातील अष्टविनायक शाळेला महानगरपालिकेने कुलूप घातले असून त्या ठिकाणी सर्वे नंबर १८८ व १८९ पैकी मनपाचे अधिनस्त मंजूर रेखांकनातील खुली जागा असा फलक लावण्यात आला आहे. काल रात्री मनपा प्रशासनाने या शाळेच्या कार्यालयाला कुलूप ठोकून हा फलक लावला होता. रोजच्या प्रमाणे विद्यार्थी शिक्षक-शिक्षिका व इतर कर्मचारी शाळेच्या प्रांगणात आले कुलूप पाहून चक्रावून गेले. त्यांनी अनेक ठिकाणी फोनवरुन संपर्क साधला. ही बाब पालकांच्याही कानी गेली. पालकांनी पुढाकार घेऊन हे कुलूप तोडले, पोलिसांना बोलावून घेतले. आता शाळा सुरु आहे पण सगळे विद्यार्थी अष्टविनायकच्या बागेतील झाडाखाली बसून आहेत. रितसर कार्यवाही झाल्याशिवाय वर्गात जाणार नाही, जार्यालयात बसणार नाही असे मुख्याध्यापक संतोष बिराजदार यांनी सांगितले. दरम्यान एनएसयूआयचे माजी अध्यक्ष मनोज चिखले आणि विद्यमान अध्यक्ष गणेश भोसले यांनी शाळेला भेट दिली. शैक्षणिक वर्ष संपत आले असून या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे असं सांगत सरकार किंवा शाळा प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे.


Comments

Top