HOME   व्हिडिओ न्यूज

कुठे कॅरी बॅग तर कुठे कपडी अन कागदी पिशव्या

प्लास्टीक बंदीमुळे फळ विक्रेते त्रस्त, दोन रुपयांची पिशवी परवडेना!


लातूर: सरकारने घातलेल्या प्लास्टीक बंदीमुळे आज सगळीकडे वेगवेगळं चित्र पहायला मिळत आहे. शहराच्या गंजगोलाई भागात फळे आणि भाज्यांचा मोठा व्यवसाय चालतो. या भागात कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर चालत असे. आज अनेकांनी कापडी पिशव्या आणून ठेवल्या पण फळे खरेदी करणारा आधीच भाव करतो त्यात दोन रुपयांची पिशवी घ्यावी लागत असेल तर चक्क फळे नाकारतो असे एका बागवान अन्वर म्हणाले. काही फळ विक्रेते सर्रास पातळ प्लास्टीक पिशव्यांचा वापर करीत होते. गोलाईतल्यात रेड्डी प्रोव्हिजन स्टोअरमध्ये मात्र ठराविक वजनापर्यंतच्या चीजवस्तू कागदी पिशव्यातून दिल्या जातात. अनेक वर्षांपासून त्यांनी हीच पद्धत सुरु ठेवली आहे. अधिक वजनाच्या सामानासाठी ते कापडी पिशव्या घेण्याचा आग्रह धरतात. शक्य नसेल तर आमची पिशवी घ्या आणि उद्या परत आणून द्या असंही रवींद्र रेड्डी सांगतात.


Comments

Top