HOME   व्हिडिओ न्यूज

स्वप्नातल्या घरांचा सौदागर पोलिसांच्या जाळ्यात

पहाटे पाच वाजता दिल्लीत अटक, कोट्यवधींची मालमत्ता पण ५० कोटी देण्यास असमर्थ


मुंबई: महाराष्ट्रातले आघाडीचे बांधकाम व्यावसायिक, घरबांधणीतील विश्वासू नाव, पुण्यात भूषणाने गौरवले जाणारे डीएस कुलकर्णी यांना आज पहाटे दिल्लीत अटक करण्यात आली. आज त्यांना न्यायालयात उभे केले जाणार आहे. डीएसके गुंतवणुकदारांचे ५० कोटी देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांच्यावर खटला चालू आहे. आजवर सहावेळा न्यायालयाची भलावण करुन डीएसकेंनी अटक टाळली होती. काल ते सापडत नसल्याने त्यांच्या शोधासाठी चार पथके रवाना करण्यात आली होती. दिल्लीतल्या पथकाच्या हाती डीएसके लागले.
पुण्यातील हडपसर जवळ उभारल्या जाणार्‍या ३०० एकरावर ड्रीम सिटी उभारण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला होता. त्याची मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजीही करण्यात आली होती. सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या या ड्रीम सिटीत, स्वतंत्र बस टर्मिनल, प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र स्टेडीयम, राहता तिथेच ऑफीस, रोजच्या वस्तूसाठी बाहेर जाण्याची गरज नाही, स्वत:ची नदी, त्यातून बोटींग, जॉगींग पार्क, शहराच्या मधोमध जंगल, आयलंड, बाजार, थिएटर, मॉल, कारंजे, क्लब हाऊस, ग्रंथालय, जीम, स्पा मसाज सेंटर, वैद्यकीय सेवा, प्रत्येक घराला प्रायव्हसी, टेक्नॉलॉजी पार्क आदी अनंत अत्याधुनिक सुविधांची स्वप्नं दाखवण्यात आली होती. कुलकर्णी यांच्यावर आता काय कारवाई होते याकडे उद्योग विश्वाचे लक्ष लागले आहे.


Comments

Top