HOME   व्हिडिओ न्यूज

शिवरायांच्या पालखी सोहळ्यात पारंपारिक खेळ, वेशभूषा


लातूर: आज दिवसभर लातूर शहराने मोठ्या उत्साहाने शिव जयंती साजरी केली. या जयंती कार्यक्रमाच्या शेवटी शहरातून शिवरायांची पालखी निघाली. या पालखी सोहळ्यात पारंपारिक पद्धतीने वेशभूषा केलेले शिवभक्त सहभागी झाले होते. ढोल, झांज, लेझीम संबळ, फुगडी, शिवकालीन खेळ यात सादर करण्यात आले. संभामहाराज चौकातून निघालेली ही पालखी शिवाजी चौकार्यंत नेली जात असून तिथेच समारोप होणार आहे. आज लातूर शहरातील प्रत्येक चौकात स्वागताचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्या त्या भागातील नागरिकांनी शिवरायांना वंदन केले. या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमही राबवण्यात आले. शिवाजी चौकात आज अभूतपूर्व गर्दी पहायला मिळाली. कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिका आणि पाण्याची सोय केली होती. पोलिस प्रशासनानेही चांगला बंदोबस्त ठेवला होता.


Comments

Top