HOME   व्हिडिओ न्यूज

धनंजय मुंडेंच्या पुतळ्याचं भाजपनं केलं दहन

सीएम, पीएमबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप


लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ लातूर शहर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा जाहीर निषेध करुन येथील गांधी चौकात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सदर आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष नितीन वाघमारे व संघटन सरचिटणीस दत्ता चेवले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. देशाच्या विकासाला प्रगतीपथावर नेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचा चौफेर विकास साधणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दोन दिवसापुर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याच्या माध्यमातून पंतप्रधान व मुख्यमंत्री यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत असून लातूरातही याचा निषेध करण्यात आला. शहरातील गांधी चौकात भारतीय जनता युवा मोर्चाचे शहरजिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक नितीन वाघमारे, संघटन सरचिटणीस दत्ता चेवले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्रीत येत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. या आंदोलनात रवीशंकर केंद्रे, गौरव मदने, अजय भुमकर, ललीत तोष्णीवाल, प्रकाश काळे, गिरीष तुळजापूरे, सचिन मोहिते, कुमार जाधव, नेताजी बोकडे, नगसेवक सुनिल मलवाड, शैलेश स्वामी, अजय कोकाटे, मंगेश बिरादार, दिपक मठपती, सौ. गिता गौड, अक्षय ढवळे, रोहित माने, सुरज वाडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.


Comments

Top