HOME   व्हिडिओ न्यूज

पाडव्यापूर्वी पाडा रस्त्यावर उजेड, येऊ द्या पाणी- मनियार

राष्ट्रवादीचे नगरसेवक राजा मनियार यांनी आयुक्तांना निवेदन, आंदोलनाचा इशारा


लातूर: शहरातील पथदिवे चालू करावे व पाणी पुरवठा चार दिवसाड करावा या मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस मार्फत आयुक्तांना देण्यात आले. हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणजे गुढीपाडवा. तो दोन दिवसांवर आला आहे. पण लातूर शहरात रस्त्यांवरील पथदिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. मागील काही महिन्यांपासून लातूर शहर काळोखाच्या विळख्यात आहे. पथदिवे तात्काळ चालू करावेत व विद्यमान सत्ताधार्‍यांनी निवडणुकांच्या वेळी लातूरवासीयांना दर चार दिवसांना पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिले होते तर आता शहरात ७ दिवसांआड पाणी पुरवठा होतो आहे. शहरास पाणी पुरवठा करणार्‍या मांजरा धरणात मुबलक पाणी पुरवठा असताना पण नागरिकांना का सुरळीत पाणी पुरवठा होत नाहीये? असा प्रश्न राजा मणियार यांनी उपस्थित केला. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे शहरातील विंधन विहरींची पाणी पातळी खोल गेली आहे. नागरिकांना पाण्य़ाची पर्यायी सोय अपूरी आहे सर्वसामान्य नागरीक सात दिवसाकरीता पाणी साठवून ठेवू शकत नाहीत त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या मागण्या ४ दिवसात मान्य नाही झाल्यास हवासोडो आंदोलन करू असा इशारा यावेळी राजा मनियार यांनी दिला आहे. यावेळी इरफान शेख, नवनाथ आल्टे, विक्रम कदम, जाकीर सय्यद, अब्दुल शेख, सचिन सुर्यवंशी, विनोद खंडाळे, विशाल आवडे, फारुख तांबोळी, राहुल बनसोडे, विकास लांडगे उपस्थित होते.


Comments

Top