HOME   व्हिडिओ न्यूज

जलयुक्तमधून मिळणार २५ हजार गावांना पाणी

लोकसहभागातून ५७० कोटीचे कामे, लोकसहभागात मराठवाड्याचा हिस्सा २७५ कोटीचा


लातूर: सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१ अंतर्गत राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला. याअंतर्गत पाच वर्षाच्या कालावधीत राज्यातील २५ हजार गावांत जलसंधारणाची विविध कामे पूर्ण करुन राज्य टंचाईमुक्त केले जाईल असे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. मार्केट यार्ड मधील कै. दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड, परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती उज्वला पाटील, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम पाटोदकर, आमदार सर्वश्री विनायक पाटील, सुधाकर भालेराव, सुरजितसिंह ठाकूर, प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, उस्मानाबाद जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चना पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मृद व जलसंधारणाचे उपसचिव कराड, संचालक केके मोटे, उपायुक्त (रोहयो) अनंत कुंभार, कृषी सहसंचालक रमेश भताने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे आदींसह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख व पुरस्कार प्राप्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानांतर्गत राज्यात लोकसहभागातून ५७० कोटीची कामे झाली असून यात फक्त मराठवाडा विभागात २७५ कोटीची कामे झाली. याअंतर्गत राज्यात सर्वत्र पाण्याचे विकेंद्रीत साठे निर्माण केली जात असून पिण्याचे पाणी व पिकांना संरक्षित सिंचनाची उपलब्धता केली जात असल्याची माहिती प्रा. शिंदे यांनी दिली. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सर्वश्री विनायक पाटील, सुधाकर भालेराव, प्रताप पाटील चिखलीकर आदी लोकप्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकार अशोक चिंचोले तर विभागस्तरावर प्रथम आलेल्या जिंतूर तालुक्यातील शेवडी गावचे सरपंच अनिरुध्द सानप यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी करुन मराठवाडा विभागाची जलयुक्त मधील कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल गालीब शेख यांनी केले. पुरस्कारप्राप्त लातुरचे पत्रकार, भूकंपचे संपादक अशोक चिंचोले यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकारही समाजाचेच घटक असताना अशा योजना राबवताना माध्यमांनाही सहभागी करुन घ्यावे असे ते म्हणाले.


Comments

Top