HOME   व्हिडिओ न्यूज

आयुक्तांचा झटका जोर से लागे! शेत खाणार्‍या कुंपणावर कारवाई!

मनपाच्या जागेवर घर बांधणार्‍या कर्मचारी जीवन कडने यांचे घर पाडण्याची कारवाई सुरु


लातूर: लातूर शहरातील ठाकरे चौक परिसरातील मनपा शाळा क्रमांक ०४ च्या जागेवर जीवन कडने यांनी ०४ हजार स्वेअर फूट जागेवर अतिक्रमण करून दोन मजली घर बांधले होते. हे घर मागील २५ वर्षांपासून असल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण २०११ सालपासून न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, औरंगाबाद खंडपीठानेही अरक्षित जागेवरील अतिक्रमणाबाबत महापालिका आयुक्तांनी सुनावनी घेऊन निर्णय देण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी न्यायालयाने असे आदेशीत केले होते की सदरील जागा ३० दिवसांच्या आत रिकामी करावी. लातूर मनपाचे नव्याने रुजू झालेले आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी हा आदेश कायम ठेवत आज सकाळी कारवाई केली. यात या घराच्या दोन खोल्या पाडण्यात आल्या. उर्वरीत जागेचा ताबा महापालिकेने घेतला आहे. घरास सील करण्यात आले आहे. यावेळी महापालिका सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, अतिक्रमण विभाग प्रमुख सहदेव बोराडे, पंडीत पवार, सुरेश कांबळे, शंकर अडगळे, मुस्तफा शेख, नागनाथ कांबळे, तुकाराम गव्हाणे, काशिनाथ पाखरे आदी मनपा कर्मचारी उपस्थित होते. कडने हे मनपाचे कर्मचारी आहेत. स्वच्छता कामात कसूर केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्य़ात आले होते. त्यांना पुन्हा कामावर घेतल्याचे वृत्त आहे.


Comments

Top