HOME   लातूर न्यूज

मांजरा कारखान्यावरील लोकनेते विलासरावांच्या स्मृतीस्थळाची पाहणी

१० फूट उंचीचा ब्रांझचा पुतळा, जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे मुझियम उभारणार


मांजरा कारखान्यावरील लोकनेते विलासरावांच्या स्मृतीस्थळाची पाहणी

लातूर: विकासरत्न विलासरावजी देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे स्मारक व स्मृतीस्थळ उभारणीचे काम सुरु असून, राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन आ. दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री व संचालक आ. अमित देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी आ. त्र्यंबक भिसे, जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज देशमुख, व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणाचे चेअरमन आबासाहेब पाटील, जागृतीचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एसआर देशमुख, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, धनंजय देशमुख, विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोविंद बोरोडे, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, मांजरा कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, आर्कीटेक्ट बंटी जाधव उपस्थित होते.
ज्या कारखान्यातून लोकनेते विलासरावांनी राजकारण व समाजकारणातील कामास सुरुवात केली त्या मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर भव्य स्मारक व स्मृतीस्थळ उभा करावे अशी मागणी शेतकरी सभासदांनी सर्वसासाधारण सभेत केली होती. त्यांच्या या भावनेचा विचार करुन संचालक मंडळाने स्मृतीस्थळ उभारणीचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून, दोन टप्प्यात याला मूर्त स्वरुप देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण होत असून, यामध्ये १० फुट उंचीचा ब्रॉन्झ धातुचा पुर्णाकृती पुतळा व त्याभोवती उद्यान साकारले जात आहे. तर दुसर्‍या टप्प्यात साहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणार्‍या म्युझियमची उभारणी केली जाणार आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांच्यावर प्रेम करणार्‍या लाखो व्यक्तींना लोकोपयोगी काम करण्याची प्रेरणा या स्मृतीस्थळ व म्युझियममधून मिळणार आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण होण्यासाठी संचालक मंडळ व प्रशासन प्रयत्नशील असल्याचे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून कळविण्यात आले आहे.


Comments

Top