HOME   लातूर न्यूज

उत्पादन कमी, आवकही कमी, तरी तुरीसाठी १० खरेदी केंद्रे

महिनाभरात ०८ हजार ५०० शेतकर्‍यांनी केली ऑनलाईन नोंदणी


उत्पादन कमी, आवकही कमी, तरी तुरीसाठी १० खरेदी केंद्रे

लातूर: मागच्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता यंदा तुरीचे क्षेत्र आणि उत्पादन जवळपास ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. मागच्या वर्षी या काळात बाजार समितीत किमान २० हजार क्विंटल तुरीची आवक व्हायची. यंदा दररोज केवळ आठ ते दहा हजार क्विंटल आवक होत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी दिली. मागच्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता नाफेडने १० ठिकाणी तूर हमी भाव खरेदी केंद्र सुरू केली आहेत. सरकारने तुरीला ५४५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. आज खुल्या बाजारात तुरीला ४५९० रुपये एवढा भाव आला होता. या १० खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी गरजेची आहे. १५ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत जिल्हाभरातील एकूण ८ हजार ५०० शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. लातूर शहर, औसा, निलंगा, साकोळ, देवणी, उदगीर, अहमदपूर, जळकोट, रेणापूर आणि चाकूर आदी दहा ठिकाणी नाफेडच्या


Comments

Top