HOME   व्हिडिओ न्यूज

बलात्काराची तक्रार चाकूर पोलिस घेईनात, लातूर पोलिसांकडे मागितली दाद

आधी मुलगी हरवल्याची तक्रार, पुन्हा बलात्काराची, पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप


लातूर: अहमदपूर तालुक्यातील तेलगाव येथील एका अल्पवयीन मुलीला अमरदीप कांबळे याने गावातून चाकूचा धाक दाखवून उदगीरला नेले, पुढे हैद्राबादला नेले, कुकर्म केले आणि पुन्हा उदगीरला आणून सोडले, ती मुलगी गावात हजर झाली. दरम्यान तिच्या पालकांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसात दिली होती. कायदेशीर कार्यवाही पूर्ण करुन मुलगी मिळाल्याचे वडिलांनी लिहून दिले. नंतर चारच दिवसांनी सगळा प्रकार सांगितल्यानंतर बलात्काराची तक्रार चाकूर पोलिसात देण्याचा प्रयत्न झाला पण पोलिसांनी दाद दिली नाही. तुमचे प्रकरण मजबूत करतो म्हणून पोलिसांनी पाच हजार रुपयेही घेतले असा आरोप त्या मुलीच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे. चाकूर पोलिस दाद देईनात म्हणून त्यांनी लातुरात एसपींची भेट घेण्याचा प्रयत्न केला. ते तुळजापूरच्या बंदोबस्तात असल्याने मुलीने आणि तिच्या वडिलाने नगरसेवक सचिन मस्के यांच्या मदतीने उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत ढवळे यांची भेट घेतली. तक्रार दिली, सारा प्रकार सांगितला. यावेळी ढवळे यांनी चाकूर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल करुन घेण्याची सूचना केली.


Comments

Top