HOME   व्हिडिओ न्यूज

लातूर-मुंबई रेल्वेच्या बलिदानाचं फळ, लातूर-बंगलोर!

खासदार म्हणतात बंगलोरसाठी मीच प्रयत्न केले, आपल्याजवळ सगळ्या प्रकारचे पुरावे


लातूर: लातूर-मुंबई लातुरमध्ये थांबून रहायची ती बिदरपर्यंत वाढवली आणि यशवंतपूर-बीदर बिदरमध्ये थांबून रहायची ती लातुरपर्यंत वाढवली. लातूर-मुंबई या गाडीच्या बलिदानाचं फळ म्हणजे बंगलोर-लातूर ही रेल्वे सुरु होते आहे. असं लोकच म्हणतात याची जाणीव आज खासदारांना करुन देण्यात आली तेव्हा ते म्हणाले, बलिदान वगैरे काही नाही. आपण सर्वांनी, माध्यमांनी प्रयत्न केल्यामुळे बंगलोर-लातूर ही गाडी सुरु होते आहे असं खासदार म्हणाले. काहीजण या गाडीचं श्रेय पालकमंत्र्यांना देतात याची आठवण करुन दिली असता खासदार म्हणाले, खासदार या नात्याने मी प्रभूंना आणि गोएल यांना विनंती केली होती. अनेकांना याबाबत भेटलो, याचे सगळ्या प्रकारचे सगळे पुरावे आपल्याजवळ आहेत. केंद्राच्या योजना फक्त खासदारांमार्फतच येतात. लातूरमध्ये उभा रहात असलेले १५० कोटींचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय केवळ खासदार सुनील गायकवाड यांच्यामुळेच होते आहे. लातूर-मुंबई गाडी नव्याने सुरु होणार आहे पण थोडा वेळ लागतोय. या सगळ्या प्रश्नांवर रेल्वेमंत्र्यांसोबत आपला संवाद घडवून आणेन असंही त्यांनी सांगितलं.


Comments

Top