HOME   व्हिडिओ न्यूज

राजमाता जिजाऊ आणि संभाजी राजे यांचे पुतळे बसवा

सकल मराठा समाजाची मागणी, मनपा आयुक्तांना दिले निवेदन


लातूर: लातूर शहरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि धर्मवीर संभाजी राजे यांचे पुर्णाकृती पुतळे बसवावेत ही मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली. २००८ पासून ही मागणी महापालिकेकडे करण्यात येत आहे. लातूरमधील शिवाजी चौकामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुर्णाकृती पुतळा उभारल्यास माय-लेकरांचे हे महाराष्ट्रातील एकमेव स्मारक ठरणार आहे. स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणार्‍या संभाजी महाराजांचा पुतळ्यासाठी औसा रोडवरील वाडा हॉटेल समोरील चौकात संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने आज आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. १९ जानेवारी रोजी होणार्‍या महासभेमध्ये हा विषय मांडून मंजुरी देण्य़ात येईल असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक या विषयास एकमताने मंजुरी देतील असे नगरसेवक राजकुमार जाधव म्हणाले. यावेळी सकल मराठा समाज समितीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top