महत्वाच्या घडामोडी

व्हीआयपी कशाला? सगळेच नागरिक महत्वाचे: मन की बात!

2017-04-30 15:43:35 Views 0 Comments

नवी दिल्ली: भारतात व्हीआयपी संस्कृतीचा द्वेष केला जातो, हा द्वेष खोलवर गेल्याचा अनुभव मला आला आहे. या देशातील प्रत्येकजण व्हीआयपी आहे, प्रत्येकजण महत्वाचा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ मध्ये सांगितले. मोदींच्या मनची ही ३१ वी बात होती. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र आणि गुजरातचाही उल्लेख केला. या दोन्ही राज्यांनी मोठे योगदान दिले आहे. अनेक महापुरुष दिले Read More »

बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाका - पालकमंत्री

2017-04-28 20:09:21 Views 0 Comments

मुंबई: बोगस बियाणे पुरवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांकडून झालेल्या नुकसानीच्या दहापट दंड आकारावा आणि या सर्व कंपन्यांची नावे काळ्या यादीत टाकावीत अशी सूचना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. खरिप हंगामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही मुंबई बैठक झाली. यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व संबंधित विभागातील अधिकारी Read More »

तूर खरेदी: दोषी शेतकर्‍यांवर फौजदारी कारवाई

2017-04-28 17:05:53 Views 0 Comments

मुंबई: कर्जात तीस लाख शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी योजना तयार करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. अडचणीत आलेल्या जिल्हा बॅंकांचं शिखर बॅंकेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. ज्या शेतकर्‍यांच्या सातबारावर तुरीच्या पेर्‍याची नोंद आहे अशांचीच तूर खरेदी केली जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं. २२ एप्रिलपर्यंत नोंद झालेल्या तुरीपैकी केवळ १० लाख Read More »

मुख्यमंत्र्यांविरोधात ठाण्यात तक्रार अन शेतकर्‍यांच्या उठाबशा!

2017-04-25 19:04:43 Views 0 Comments

मुंबई: शिल्लक तुरीचं प्रकरण वरचेवर चिघळत चाललं आहे. आज पैठण येथे एका शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार केली तर अकोल्यात शेतकर्‍यांनी उठाबशा काढऊन मन की बात ऐकणार नाही असं सुनावलं आहे. नाफेडकडून सुरु असलेली तूर खरेदी २२ एप्रिल रोजी बंद झाली. यामुळे अनेक ठिकाणी खरेदी केंद्रांबाहेर लाखो टन तूर विक्रीसाठी पडून आहे. तूर संपेपर्यंत खरेदी करु असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं Read More »

२२ एप्रिल पर्यंतची सर्व तूर खरेदी करावी- मुख्यमंत्री

2017-04-24 19:52:00 Views 0 Comments

नवी दिल्ली: २२ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्रावर आलेली सर्व तूर खरेदी करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज कृषी भवन येथे केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व Read More »

‘नीट’ परिक्षार्थींसाठी आ. चव्हाण यांच्याकडून निवास-भोजन-प्रवासाची सोय

24-04-2017 : 06:27:53 Views 0 Comments

औरंगाबाद: वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात ७ मे २०१७ रोजी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ‘नीट’ (NEET) परीक्षा घेण्यात येणार आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून ही परीक्षा देण्यासाठी हजारो विद्यार्थी औरंगाबाद शहरात येणार आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या वतीने ‘नीट’ परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची, भोजनाची व परीक्षाकेंद्रांपर्यंत पोहचविण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
आ. सतीश चव्हाण म्हणाले की, ‘नीट’ परीक्षेचे Read More »

तामिळनाडूच्या शेतकर्‍यांनी केलं मूत्र प्राशन, विष्ठा खाण्याची धमकी

22-04-2017 : 10:45:31 Views 0 Comments

नवी दिल्ली: तामिळनाडुतील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे. १४ मार्चपासून हे शेतकरी जंतरमंतरवर आंदोलन करीत आहेत पण अद्याप त्यांचा आवाज हवा तिथपर्यंत पोचू शकला नाही. या शेतकर्‍यांनी आंदोलनस्थळी हाडाचे सापळे आणले होते. हे सापळे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचे आहेत असा दावा त्यांनी केला होता, या शेतकर्‍यांनी अनेकदा प्रतिकात्मक अंतयात्रा काढल्या, साड्या नेसल्या, बांगड्या फोडल्या, नग्नावस्थेत रस्त्यावरुन आरडाओरड केली. Read More »

गुजरात सिमेवरच अडवली शेतकरी आसूड यात्रा

20-04-2017 : 08:51:34 Views 0 Comments

गुजरात: शेतकर्‍यांच्या प्रश्नी आ. बच्चू कडू यांनी नागपुरातून काढलेली आसूड यात्रा आज गुजरात सिमेवर अडवण्यात आली. सीएम टू पीएम म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गावापासून ते पंतप्रधानांच्या गावापर्यंत असा या यात्रेचा प्रवास होता. पंतप्रधानांच्या वडनगरात जाऊन आ. कडू आणि त्यांचे आंदोलक शेतकरी रक्तदान करणार होते. त्या आधीच मोठी कुमक घेऊन आलेल्या गुजरात पोलिसांनी त्यांना रोखलं, लाठीमारही झाला. आंदोलकांना पोलिसांनी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात पाठवले. Read More »

एक मे पासून लाल दिवा बंद! मुख्यमंत्र्यांनीही उतरवला..

2017-04-19 22:37:54 Views 0 Comments

नवी दिल्ली: केद्र आणि राज्य सरकारातील मंत्री तसेच बड्या अधिकार्‍यांच्या गाड्यावरील लाल दिव्यांवर ०१ मे पासून बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून याची महिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गाडीवरील दिवा उतरवला. लाल दिवे बंद करण्याबाबत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी प्रस्ताव दिला होता. गडकरींनीही आपल्या गाडीवरील दिवा काढून टाकला आहे. व्हीआयपी संस्कृतीला यामुळे लगाम बसेल असे Read More »

बाबरी प्रकरणी अडवाणी, जोशींसह १३ जणांवर खटला चालवण्याचे आदेश

2017-04-19 22:29:28 Views 0 Comments

नवी दिल्ली: १३ ज्येष्ठ नेत्यांवर बाबरी मशीद प्रकरणी फौजदारी खटले चालवण्यात यावेत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती, कल्याण सिंह यांचा समावेश आहे. या सर्वांवर बाबरी मशीद प्रकरणी कट रचल्याचा आरोप आहे. दरम्यान कट कसला खुले आम आम्ही वादग्रस्त वास्तू पाडली होती अशी प्रतिक्रिया उमा भारती यांनी दिली आहे. बाबरी Read More »

SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!