महत्वाच्या घडामोडी

अखिलेश यादवांच्या सपाची कॉंग्रेससोबत आघाडी!

2017-01-17 20:27:39 Views 0 Comments

लखनौ: उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाच्या पडझडीत अखिलेश यादव जिंकले असले तरी येत्या निवडणुकीत भाजपाचे संकट टाळण्यासाठी त्यांनी कॉंग्रेससोबत आघाडी केली आहे. हे दोन्ही पक्ष ही निवडणूक मिळऊन लढवणार आहेत. याबाबतची घोषणा आज कॉंग्रेसकडून करण्यात आली. शिला दिक्षित उत्तरपरदेशातील निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील अशी घोषणा आधी करण्यात आली होती. ती आता मागे घेण्यात आली आहे. कालच निवडणूक आयोगाने अखिलेश गटाला सायकल चिन्ह Read More »

सायकल स्पर्धेत अखिलेश विजयी, पक्षाचे नावही जिंकले!

2017-01-16 20:31:03 Views 0 Comments

लखनौ: समाजवादी पक्षाची दोन शकले पडल्यानंतर अखिलेश अणि मुलायम गटांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. आपलाच गट करा समाजवादी पक्ष आहे, आम्हालाच हे नाव द्यावे आणि चिन्हही द्यावे अशी मागणी या दोघांनी केली. दोघांची निवडणूक आयोगाकडे सुनावणीही झाली. या दोघांनी आपापल्या समर्थक आमदार आणि खासदारांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. सुनावणी दिवशी आयोगाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज अखेर Read More »

मुंबईत राष्ट्रवादीशी आघाडी नाही, लातूरची बैठक परवा

2017-01-16 17:38:25 Views 0 Comments

मुंबई-लातूर: मुंबई महानगरपाकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आधीच उमेदवारांची यादी जाहीर केल्याने या पक्षासोबत कॉंग्रेसची आघाडी होणे अशक्य आहे असे आज प्रांताध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले. हे दोन्ही पक्ष मुंबईत आता स्वबळावर लढताना दिसतील. असे असले तरी त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर आघाडी करायची की नाही याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. लातुरात आज पारिजात मंगल कार्यालयात राष्ट्रवादीने जिल्हा परिषद Read More »

मिलीटरीतल्या जवानांना सोशल मिडीया वापरण्याची परवानगी नाही!

2017-01-14 23:08:26 Views 0 Comments

नवी दिल्ली: सीआरपीफ, आरपीएफ, सीएसआयपीएफ आणि बीएसफच्या जवानांना व्हाट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राफ, फेसबुक सारख्या सोशल मिडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. एखादा फोटो किंवा विडीओ व्हायरल करायची इच्छा असल्यास त्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल असा दंडक गृहमंत्रालयाने घातला आहे! अलीकडे अनेक जवानांनी सोशल मिडियावरुन आपबिती सांगितली होती. त्यामुळे लषकराची आणि सरकारचीही अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. यामुळे सरकार खडबडून जागे झाले. Read More »

संक्रांतीमुळे युतीचा निर्णय परवावर? कुठे चाललाय महाराष्ट्र?

2017-01-13 22:27:58 Views 0 Comments

संक्रांत वाईट? मग लेकी बाळींच्या हळदी कुंकुवावर बंदी घाला- रवींद्र जगताप
मुंबई: जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या पण अद्याप युती आणि आघाडीचे घोडे अडलेलेच आहे. उद्या संक्रांत असल्याने उद्याही बोलणी होणार नाही असं शिवसेनेचे खासदार अनिल देसाई सांगतात! सगळा निर्णय परवावर गेला आहे. दरम्यान भाजपाने एक सर्वे केला असून युती न झाल्यास त्याचा फायदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला Read More »

२५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांसाठी १६ व २१ फेब्रुवारीला मतदान

2017-01-11 20:20:16 Views 0 Comments

मुंबई : बृहन्मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होणार आहे. २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्यांत १६ फेब्रुवारी व २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होईल. पहिल्या टप्यात १५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या १६५ पंचायत समित्या आणि दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याची Read More »

शिक्षक मतदारांवर प्रभाव पडू नये यासाठी दक्षता घ्या- आयुक्त

2017-01-06 19:14:00 Views 0 Comments

औरंगाबाद: भारत निवडणूक आयोगाने बुधवार, ०४ जानेवारी रोजी औरंगाबाद विभागाच्या शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. निवडणूक पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षक मतदारांवर कोणत्याही प्रभाव पडणार नाही यासाठी सर्वांनी निवडणूक आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केले.
विभागीय आयुक्त यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत Read More »

पाच राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर, मोदींची परिक्षा

2017-01-04 22:09:42 Views 0 Comments

नवी दिल्ली: उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ११ जानेवारी ते ०८ मार्च या काळात या निवडणुका पार पडणार आहेत. ११ मार्च रोजी या पाचही राज्यांचा निकाल जाहीर होणार आहे. आजपासूनच या सगळ्या राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. पाच राज्यात ६९० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. दिव्यांगांसाठी मतदन केंद्रांवर विशेष सोय केली जाणार आहे. काहे Read More »

बीएसएनएलची १४४ रुपयात कुठल्याही नेटवर्कवर अमर्याद कॉलिंग

2017-01-01 15:28:36 Views 0 Comments

नवी दिल्ली: रिलायन्स आक्रमकपणे बाजारात उतरल्यानंतर सगळ्याच कंपन्यांचे ‘उंट पहाड के निचे आ गये!’ मोबाईल कंपन्या रोजच नवनव्या ऑफर्स देत आहेत. सगळ्यांनीच इंटरनेट डेटाचे दर कमी केले. त्याला उत्तर म्हणून रिलायन्सने घरपोच मोफत सीमकार्ड पोचवण्याची व्यवस्था केली. आता सगळीकडेच जिओचा बोलबाला असल्याने ग्राहक टिकवणे याला सगळ्या कंपन्या प्राधान्य देत आहेत. अलिकडेच बीएसएनएलने ३२९ रुपयात एक जीबी डेटा आणि एक महिनाभर Read More »

अखिलेश यादव सपाचे प्रमुख, अमर सिंह पक्षाबाहेर!

2017-01-01 13:45:52 Views 0 Comments

लखनौ: उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीतल्या नाटकाने नवे वळण घेतले आहे. आज बर्‍याच घडामोडींनंतर अखिलेश यादवांना पक्षाचं प्रमुखपद बहाल करण्यात आलं. अमर सिंह यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले असून शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन दूर करण्यात आले आहे. अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांना आधी पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. काल पक्षाने घूमजाव करुन या दोघांनाही पुन्हा पक्षात घेण्यात आले. आज तातडीने समाजवादी Read More »

SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!