महत्वाच्या घडामोडी

सदाभाऊंची चौकशी, आता देशव्यापी कर्जमुक्ती किसान यात्रा

2017-06-28 21:35:59 Views 0 Comments

पुणे: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत संघटना-शेतकरी विरोधी भूमिका मांडतात अशा आशयाच्या अनेक तक्रारी आज झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आल्या. सदाभाऊंची हकालपट्टी करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी चौघांची समिती नेमण्यात आली आहे. आपली बाजू मांडण्यासाठी सदाभाऊंना ०४ जुलै ही मुदत देण्यात आली आहे. दरम्यान शेतकर्‍यांचे हे आंदोलन आता देशव्यापी होणार असून येत्या सहा जुलैपासून मध्यप्रदेशातील Read More »

ऐतिहासिक कर्जमाफी: पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना नांगराची प्रतिकृती भेट

28-06-2017 : 08:40:22 Views 0 Comments

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याला कर्जमुक्तीची ऐतिहासिक भेट दिल्याबद्दल राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंत्रालयात शेत नांगराची प्रतिकृती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ जाहीर करून कर्जमुक्तीचा ऐतहासिक निर्णय घेतला. देशाच्या इतिहासातली सर्वात मोठी ३४,०२२ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील तब्बल Read More »

९३ च्या बॉंबस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू

2017-06-28 16:07:09 Views 0 Comments

मुंबई: १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉंब स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या धक्क्याने जेजे रुग्णालयात आज मृत्यू झाला. छातीत दुखू लागल्याने त्याला काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ९३ च्या साखळी स्फोटप्रकरणी दोषी ठरल्यानंतर कालच त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी वकिलांनी केली होती. डोसा आजारीही होता आणि कालच्या खटल्याच्या कामकाजाचे कळाले असावे यामुळे तो तणावाखाली असावा असे सांगण्यात आले. Read More »

धनदांडग्यांसाठी सुकाणू? खोतांच्या हकालपट्टीची शक्यता

2017-06-27 22:28:51 Views 0 Comments

मुंबई: धनदांडग्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा म्हणून सुकाणू समितीचा आटापिटा चालू आहे, पाच लाख, दहा लाख रुपयांची कर्ज माफी मिळावी ही समिती प्रयत्नशील आहे, सगळे निकष बाजुला ठेऊन सरकारने कर्जमाफी दिली असा दावा कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केला आहे. दरम्यान शेतकरी संघटना नव्यानं आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे.
उद्या बुधवारी पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत Read More »

अवयवदानात पुणे आघाडीवर, सहा जणांवर हृदय प्रत्यारोपण

2017-06-27 15:08:21 Views 0 Comments

पुणे: राज्यातील सर्वात जास्त अवयव देणगीदार असलेले शहर म्हणून राज्यात अग्रगण्य ठरलेल्या पुण्याला ०३ महिन्यांच्या कालावधीत ०६ हृदय प्रत्यारोपण करण्याचे श्रेय मिळाले आहे. यातील ०३ प्रत्यारोपण एका आठवड्याच्या आत केल्या गेल्या आहेत. झेडटीसीसी पुणेच्या श्रीमती आरती गोखले यांच्या मते, मुंबईतील ५४ जणांच्या तुलनेत ५६ अवयव देणगीदारांसह सर्वाधिक अवयव दात्यांच्या बाबतीत पुण्याने महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे.
यातील पहिले हृदय प्रत्यारोपण ०५ Read More »

दीड लाखांची कर्जमाफी अमान्य, शेतकरी करणार पुन्हा आंदोलन

2017-06-25 20:56:01 Views 0 Comments

मुंबई: सरसकट दीड लाखांची कर्जमाफी शेतकरी सुकाणू समितीनं अमान्य केली असून सरसकट संपूर्ण कर्जमाफी न केल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आज देण्यात आला आहे. ०९ जुलै ते २३ जुलै या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढण्यात येणार असून या काळात पुढील आंदोलनाची रुपरेषा समजावली जाणार आहे. २६ जुलैपासून नव्याने आंदोलन छेडले जाईल असे समन्व्यक अजित नवले यांनी सांगितले. सरकारने आजवरची Read More »

ज्यांचे सरकार, त्यांचा राष्ट्रपती, उपयोग काय?- ठाकरे

2017-06-24 21:15:04 Views 0 Comments

मुंबई: या देशात ज्यांचे सरकार असते त्यांचाच राष्ट्रपती होतो, रबर स्टॅंपच्या पलीकडे त्यांचा काय उपयोग आहे, हे राष्ट्रपती सर्वसामान्यांच्या काय उपयोगाला पडतात असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. भाजपा आघाडीने रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली यावर ते प्रतिक्रिया देत होते.
देशात शेतकर्‍यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत, मराठा आरक्षणासाठी कित्येक मोर्चे निघाले. Read More »

मीरा कुमार, राष्ट्रपती निवडणुकीत, विरोधकांच्या उमेदवार

2017-06-22 21:46:35 Views 0 Comments

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार कॉंग्रेस प्रणित विरोधकांच्या आघाडीच्या उमेदवार ठरल्या आहेत. कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांची आज दिल्लीत बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव कॉंग्रेसने मांडला होता. संसदेतील १७ विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. मुळच्या बिहारच्या असलेल्या मीरा कुमारही दलित नेत्या आहेत. बिहारमधूनच त्या लोकसभेवर पाचवेळा Read More »

बीड शहर अंधारात, पालिकेकडे वीज बिलाचे २१.३१ कोटी थकीत

2017-06-22 7:40:18 Views 0 Comments

बीड: महावितरणतर्फे घरगुती, वाणिज्यक, औदयोगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती वर्गवारीतील ग्राहकांकडे अब्जावधी रुपयांची विजेच्या बिलांची बाकी थकल्याने महावितरण समोरिल आडचणी वाढल्या आहेत. थकबाकीसह विकलेल्या विजेच्या देयकांची वसूली होणे गरजेचे बनल्याने महावितरणतर्फे थकबाकीदारांविरुध्दची मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून संपूर्ण बीड शहरातील सर्वच्या सर्व २४५ सार्वजनिक दिवाबत्तीची कनेक्शन्स महावितरणने २० जून रोजी तोडली आहेत. सार्वजनिक दिवाबत्तीचे बीड नगर Read More »

सॅनिटरी नॅपकीन जीएसटीतून वगळा, लातुरकर महिलांचे मुंबईत उपोषण

2017-06-22 7:22:35 Views 0 Comments

मुंबई (आलानेप्र): नव्या कर पद्धतीत कंडोम करमुक्त करण्यात आले आहे पण महिलांच्या आरोग्याशी संबंधित असणारे सॅनिटरी नॅपकीन मात्र या कराच्या ओझ्याखाली दबले आहे. यामुळे महिलांना ते परवडत नाही. परिणामी कापडाचा वापर केल्याने आरोग्याचे प्रश्न उभे राहतात. सॅनिटरी नॅपकीन करमुक्त करावे यासाठी विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने छाया काकडे यांनी ग्रामीण भागात आंदोलने उभारली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आझाद मैदानावर Read More »

SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!