महत्वाच्या घडामोडी

राज्याचा अर्थसंकल्प: शेतकरी विकासाचा संकल्प पण कर्जमाफी नाही

18-03-2017 : 07:35:09 Views 0 Comments

मुंबई: आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. ४६११ कोटी रुपयांच्या तुटीच्या अर्थसंकल्पात शेतकरी आणि ग्रामीण विकासाचा संकल्प मांडण्यात आला आहे. त्यासाठी भरीव तरतूद करण्यत आली आहे. या संकल्पाच्या निमित्ताने कर्जमाफीची अपेक्षा होती पण ती सफल झाली नाही. सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडला पाने पुसली असा आरोप करीत विरोधी सदस्यांनी गाजर खाण्याचे आंदोलन केले.
अर्थमंत्र्यांचे संकल्पीय भाषण सुरु होताच Read More »

थकित वीज बिल हप्त्याने भरण्यास प्रोत्साहन

2017-03-18 10:51:48 Views 0 Comments

मुंबई: राज्यातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजना व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनेतील ग्राहकांकडे असलेली वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम हप्त्यांने भरुन ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणने प्रोत्साहन योजना आणली आहे अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एका निवेदनातून दिली. सार्वजनिक पाणी पुरवठा व उच्च दाब उपसा जलसिंचन योजनांचा थकित वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे Read More »

प्रत्येक लांब पल्ल्याच्या रेल्वेत आता रुग्णवाहिकेचा डबा!

2017-03-16 21:00:21 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी सर्व अत्यावश्यक सेवांसह सुपरस्पेशालिटी रुग्णवाहिका असलेला डबा जोडावा, अशी मागणी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केली होती, त्याची दखल अवघ्या एका वर्षातच घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी प्रत्येक लांब पल्ल्याच्या रेल्वेला अत्याधुनिक सेवा असलेला रुग्णवाहिका डबा सुरु केला आहे.
भारतीय रेल्वेचे जाळे हे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरले आहे. रेल्वेच्या या सेवेमुळे दळण वळणासह Read More »

कवीश्रेष्ठ सुरेश भट यांचा आज स्मृतीदिन, वाचा त्यांची गझल!

2017-03-14 13:44:08 Views 0 Comments

ज्येष्ठ कवी, जीवन भाष्यकार मराठी गझल सम्राट सुरेश भट यांचा आज स्मृतीदिन. त्यांची एक गझल-कविता-गाणे येथे देत आहोत. शब्दातलं प्रभूत्व काय असतं, हे कळेल. कवितेचा भाव किती प्रभावी आणि प्रगल्भ असतो हेही कळेल आणि या निमित्ताने आपल्या स्मृतीआड जात असलेल्या अवलियाची अदाकारीही कळेल हा या मागचा उद्देश!

जगत मी आलो असा....

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा Read More »

विश्वनाथ महाडेश्वर मुंबई मनपाचे नवे महापौर, मनसेचा बहिष्कार

2017-03-09 14:25:52 Views 0 Comments

मुंबई- मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आले आहे. शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांची महापौरपदी तर हेमांगी वरळीकर या उपमहापौरपदी निवड. महाडेश्वरांना शिवसेनेचे ८४, भाजपचे ८३ आणि अपक्ष ०४ नगरसेवकांचे समर्थन मिळाले. हा आकडा १७१ व जातो.
शिवसेनेने मुंबईत जोरदार जल्लोष केला. महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात विजयी सलामी दिली. हुतात्मा स्मारकावर शिवसैनिकांनी अभिवादनही केले.
समाजवादी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादीने हात वर केले नाहीत. Read More »

भारतावर पुन्हा दुष्काळाची छाया, २०१७ खडतर!

2017-03-01 17:32:52 Views 0 Comments

मुंबई: २०१७ सालात भारत आणि महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा दुष्काळ येण्याचे संकेत आहेत. जागतिक हवामान केंद्र आणि भारतीय हवामान खाते यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. या सोबतच यंदाचा उन्हाळा आजवरच्या उन्हाळ्यातला सर्वात वाईट उन्हाळा असणार आहे. या वर्षीच्या भारतीय मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल तो टिकला तर पाऊसमान घटेल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. ऑस्ट्रेलियन वेधशाळेने याबाबतचा पहिला Read More »

लाचप्रकरणी विभागीय अधिकारी शोभा राऊत यांना कारावास आणि दंड

2017-02-28 12:33:31 Views 0 Comments

उस्मानाबाद: शेतकर्‍याला मावेजा मिळवून देण्यासाठी लाच स्विकारताना रंगेहात सापडलेल्या उस्मानाबादच्या तत्कालीन विभागीय अधिकारी शोभा राऊत यांना चार वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव येथील एका शेतकर्‍याला संपादीत करण्यात आलेल्या जमिनीवरील फळझाडांचा मावेजा देण्यासाठी राऊतांनी पाच टक्के रक्कम अर्थात ३९ हजार २०० रुपयांच्या लाचेची Read More »

अस्सल मराठी बोलणे आजकाल दुरापास्त - कुलगुरू डॉ. विद्यासागर

2017-02-27 19:20:44 Views 0 Comments

नांदेड: आपण आपल्या पाल्यास मराठी माध्यमातून शिक्षण देण्याऐवजी इंग्रजी माध्यमातून देत आहोत. याचाच परिणाम म्हणून आपले पाल्य धड इंग्रजीही व्यवस्थित बोलत नाही आणि धड मराठीही. बोलताना दोन्हीही भाषेतील शब्दांचा उपयोग सध्या सर्रास होताना दिसत आहे. त्यामुळे अस्सल मराठी बोलणे आजकाल दुरापास्त होत आहे, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.
ते मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून Read More »

‘मन की बात’मध्ये शास्त्रज्ञ अन शेतकर्‍यांचं कौतुक!

2017-02-26 14:42:33 Views 0 Comments

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून देशाशी संवाद साधला. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेला विक्रम आणि शेतकर्‍यांनी केलेल्या कडधान्याच्या उत्पादनाबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले. इस्रोने आजवर अनेक मोहिमा यशस्वी केल्या. एकाच वेळी १०४ उपग्र प्रक्षेपित करुन देशाचे नाव जगभर केले. यामुळे भारताची मान जगात उंचावली आहे.
स्वच्छता मोहिमेत देश सहभागी झाला. या मोहिमेतील अडथळे दूर झाले. माध्यमांनीही स्वच्छता मोहिमेला Read More »

सेनेला कॉंग्रेसचा नकार, भाजपाचा कॉंग्रेसला नकार, जायचे त्यांनी जावे!

2017-02-25 19:49:27 Views 0 Comments

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने कॉंग्रेसकडे मदत मागितली होती पण कॉंग्रेसने शिवसेनेला स्पष्ट नकार दिला. आम्ही सेक्युलर आहोत. तो बाणा सोडणार असे बजावल्याचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. याबाबत ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी श्रेष्ठींना पत्र पाठवले आहे. समाजात फूट पाडणार्‍या शिवसेनेसोबत जाऊ नये किंवा बाहेरुनही पाठिंबा देऊ नये असे कामत म्हणतात. तर भाजपा कॉंग्रेससोबत कदापिही जाणार नाही. ज्यांना Read More »

SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!