महत्वाच्या घडामोडी

मीरा कुमार, राष्ट्रपती निवडणुकीत, विरोधकांच्या उमेदवार

2017-06-22 21:46:35 Views 0 Comments

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार कॉंग्रेस प्रणित विरोधकांच्या आघाडीच्या उमेदवार ठरल्या आहेत. कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांची आज दिल्लीत बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव कॉंग्रेसने मांडला होता. संसदेतील १७ विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. मुळच्या बिहारच्या असलेल्या मीरा कुमारही दलित नेत्या आहेत. बिहारमधूनच त्या लोकसभेवर पाचवेळा Read More »

बीड शहर अंधारात, पालिकेकडे वीज बिलाचे २१.३१ कोटी थकीत

2017-06-22 7:40:18 Views 0 Comments

बीड: महावितरणतर्फे घरगुती, वाणिज्यक, औदयोगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक दिवाबत्ती वर्गवारीतील ग्राहकांकडे अब्जावधी रुपयांची विजेच्या बिलांची बाकी थकल्याने महावितरण समोरिल आडचणी वाढल्या आहेत. थकबाकीसह विकलेल्या विजेच्या देयकांची वसूली होणे गरजेचे बनल्याने महावितरणतर्फे थकबाकीदारांविरुध्दची मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून संपूर्ण बीड शहरातील सर्वच्या सर्व २४५ सार्वजनिक दिवाबत्तीची कनेक्शन्स महावितरणने २० जून रोजी तोडली आहेत. सार्वजनिक दिवाबत्तीचे बीड नगर Read More »

सॅनिटरी नॅपकीन जीएसटीतून वगळा, लातुरकर महिलांचे मुंबईत उपोषण

2017-06-22 7:22:35 Views 0 Comments

मुंबई (आलानेप्र): नव्या कर पद्धतीत कंडोम करमुक्त करण्यात आले आहे पण महिलांच्या आरोग्याशी संबंधित असणारे सॅनिटरी नॅपकीन मात्र या कराच्या ओझ्याखाली दबले आहे. यामुळे महिलांना ते परवडत नाही. परिणामी कापडाचा वापर केल्याने आरोग्याचे प्रश्न उभे राहतात. सॅनिटरी नॅपकीन करमुक्त करावे यासाठी विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने छाया काकडे यांनी ग्रामीण भागात आंदोलने उभारली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आझाद मैदानावर Read More »

परळीचे औष्णिक वीज निर्मिती केंद्र बंद

2017-06-20 20:16:25 Views 0 Comments

बीड: खर्च आणि उत्पन्न याचा मेळ लागत नसल्यानं परळीचं औष्णिक वीज निर्मिती केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. या केंद्रात वीज निर्मिती करणारे आठ संच आहेत. यातून ७५० मेगावॅट वीज निर्मितीची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात ५५० मेगावॅट निर्मिती होत असल्याचे सांगण्यात आले. हे केंद्र चालवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, पाणी, रसायने आणि साहित्यावर होणारा खर्च वीज विकून मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत Read More »

३० जूनला मध्यरात्री खास कार्यक्रमात लागू होणार जीएसटी

2017-06-20 16:09:37 Views 0 Comments

नवी दिल्ली: ‘एक देश एक कर प्रणाली’ या न्यायाने येत्या एक जुलै पासून जीएसटी कर पद्धती लागू होत आहे. याचा शुभारंभ ३० जूनच्या मध्यरात्री संसदसेच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतपधान मनमोहनसिंग आणि एचडी देवेगौडा तसेच संसदेचे सर्व सदस्य, राज्याचे अर्थमंत्री, जीएसटी कौन्सिल सदस्य आणि या कर Read More »

उत्तरप्रदेशातील कारागृहात गोशाळा, भटक्या गायींचीही सोय

2017-06-19 17:34:01 Views 0 Comments

लखनौ: उत्तरप्रदेशातील सर्व जिल्हा कारागृहात गोशाला उभारण्याचा निर्णय तिथल्या राज्य सरकारनं घेतला असून या प्रस्तावावर सध्या काम सुरु आहे. राज्याती ल कारागृहात अशा प्रकारचा उपक्रम राबवता येईल का याची माहिती कारागृह राज्यमंत्री जयकुमार सिंग यांनी दिली. या नव्या उपक्रमामुळं गायींना आधार मिळेल, सेंद्रीय शेतीला पूरक काम होईल अशी संकल्पना आहे. गौतम बुद्धनगर येथील कारागृहात अशा पद्धतीचे काम सुरु झाले आहे.
मागच्या Read More »

रामनाथ कोविंद, भाजपाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

2017-06-19 15:16:14 Views 0 Comments

नवी दिल्ली: लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, मोहन भागवत, सुषमा स्वराज यांची नावे चर्चेत असताना भाजपाने आज अनपेक्षितरित्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव घोषित केले. कोविंद २३ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कालच भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपाच्या राष्ट्रपती उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. आधी उमेदवार Read More »

उमेदवार कुणीही असेल पाठिंबा देता का?- शाह, आधी उमेदवार सांगा- ठाकरे

2017-06-19 7:26:42 Views 0 Comments

मुंबई: भाजपाचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार अजून ठरायचा आहे, त्या आधीच अध्यक्ष अमित शाह यांनी मतं जमवायला सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. घटक पक्षांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार पंतप्रधानांना दिले आहेत असं सांगत शिवसेनेचा पाठिंबा मागितला. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना तोडीस तोड उत्तर दिले, आधी उमेदवार सांगा मग पाठिंब्याचं बघू असं त्यांनी सांगितल्याचं Read More »

उद्या रविवारी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, पाणी प्रश्नी उत्तरे

2017-06-17 21:21:02 Views 0 Comments

मुंबई: राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’कार्यक्रमाच्या ‘पाणी’ या विषयावरील दुसऱ्या भागाचे उद्या रविवारी १८ जून २०१७ रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन सकाळी १०.०० वाजता प्रसारण होणार आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित या कार्यक्रमाचे प्रसारण उद्या रविवारी १८ जून २०१७ रोजी दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी, झी २४ तास आणि साम टिव्ही या वाहिन्यांवरुन सकाळी Read More »

नांदेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन

2017-06-17 21:11:49 Views 0 Comments

मेधा पाटकर, कुमार केतकर, डॉ. प्रज्ञा दया पवार, संजय आवटे, डॉ. भालचंद्र कांगो यांची उपस्थिती
नांदेड (प्रतिनिधी) - समाजाला संविधानसाक्षर करणे, सांवैधानिक नैतिकतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन प्रतिष्ठित करणे आणि सर्व समविचारी प्रागतिक तत्त्वांचा समन्वय घडवून आणणे, या उद्दिष्टपूर्तीसाठी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचा वैचारिक वारसा प्रगल्भतेने पुढे नेण्याच्या दृष्टीने येत्या २५ जून २०१७ रोजी एक दिवसीय पाचवे डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!