Editorial

होय, लोभे कुटुंबियांना सरकारी नोकरी मिळालीच पाहिजे, फेसबुकवर आक्रमक प्रतिक्रिया

02-10-2017 : 08:33:18 4305 Views 0 Comments

किरण लोभे विजेच्या धक्क्यानं फेकला गेला, मेंदुला इजा झाली, मेंदू निष्क्रीय झाला आणि त्याच्या अवयवांचं दान करण्याचं धाडस, औदार्य लोभे कुटुंबियांनी दाखवलं. यात किरणच्या आईची भूमिका महत्वाची होती. आपल्या काळजाच्या तुकड्याचं काळीज कुणाला बसवलं जाणार आहे, त्याच्या मूत्रपिंडांचे लाभार्थी कोण? याचा विचारही न करता त्या माऊलीने उचललेलं पाऊल कौतुकाच्या, अभिनंदनाच्या, गौरवाच्या पलिकडचं आहे. आपलं लेकरु हरवलं, त्याचे अवयवही गेले. अतिशय गरीब लोभे कुटुंबियांचा कमावता हात गेला. आता जबाबदारी समाजाची आणि सरकारचीही आहेच. समाज करायचं ते करतो आहेच. पण सरकार? सरकारनं काय करायला हवं? सरकारनं या कुटुंबातील किमान एका व्यक्तीला सरकारी सेवेत घेतलं पाहिजे. यावर आजलातूर-नेटवाणीने फेसबुककवर परिसंवाद घडवला. हजारोंनी त्याला प्रतिसाद दिला. सरकारने लोभे कुटुंबातील एका व्यक्तीला सेवेत घ्यायलाच हवं असं फेसबुककर म्हणतात. काय म्हणतात?.....
अगदी बरोबर शासकीय सेवेत घेतलेच पाहिजे असं महेश जाधव, बालाजी पिचारे, अतुल शिंदे, अब्दुल गालीब शेख, वैशाली गुंजकर, इम्रान सय्यद, रफीक सय्यद आणि त्यांचे ७५ मित्र, काकासाहेब धुमाळ, अमितकुमार म्हेत्रे, अर्जून माने, तेज्स बाहेती आणि त्यांचे १५ मित्र, अनिल कबाडे, कुक्रम सय्यद, बालाजी जगताप, महेश बिलापट्टे, अजय साठे, घनशाम पाटील, यशवंत वाघमारे आणि त्यांचे १२ मित्र, अंजुकुमार कावळे, उत्तमकुमार होळीकर, विशाल आवाडे, गुणवंत भोसले, राजश्री पायगुडे, वैभव शहा, तानाजी कणसे, श्रीमंत गोरे, पप्पू पावले, प्रताप भोसले, दिलीप भोसले आणि विकास गाढवे यांच्यासह त्यांचे १७ मित्र, अनंत यादव आणि त्यांचे २१ मित्र म्हणतात.
अगदी न्यायपूर्ण ठरेल असं अनंत चव्हाण आणि त्यांचे पाच मित्र म्हणतात. आपलं म्हणणं एकदम संयुक्तिक आहे असं अशोक आरदवाड यांना वाटतं.
लोभे कुटुंबाला सरकारी नोकरीत संधी दिली पाहिजे असं रोहित दयाळ म्हणतात.
कार्यास सॅल्युट, अगदी बरोबर आहे. खरोखर असे झाले तर त्याने, त्याच्या कुटुंबाने केलेल्या कार्याचा सन्मान होईल आणि अवयव दाना बाबतीत जनजागृती नक्की होईल, सरकारने या बाबत निश्चितपणे विचार करावा व ठोस सकारात्मक निर्णय घ्यावा असं सुरेंद्र जगताप यांना वाटतं.
ही कल्पना अप्रतिम आहे असं सचिन शिंदे आणि त्यांचे १० मित्र म्हणतात. हे विचार अगदी योग्य आहेत, तात्काळ अमलात यावेत असं सूर्यकांत चव्हाण यांना वाटतं. महादेवी पाटील आणि त्यांच्या पाच मित्रांची हीच प्रतिक्रिया आहे. अगदी योग्य मुद्दा मांडला असेच व्हायला हवे असं अविष्कार श्रीराम गोजमगुंडे सांगतात. लातूर जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे, किरणने तिघांना जिवनदान दिले. कुटुंबातील व्यक्तीने अवयव दानाचा निर्णय घेतला अशा कुटुंबियांचा शासनाने नक्कीच विचार करावा असं रामदास सरगे आणि त्यांचे १६ मित्र म्हणतात. खरंच असं झालं तर नवीन संदेश इतर जनतेलाही पोहचेल असं मत श्रीकिशन कावळे यांनी व्यक्त केलं आहे.
असे करण्यास काहीच हरकत नाही पण यांना सरकारला हे सुद्धा सांगावे लागतंय हे दुर्दैव आहे अशी खेदजनक प्रतिक्रिया राजकुमार पवार यांनी व्यक्त केली आहे.
किरण लोभेचे आईवडील हे सर्वात श्रीमंत आहेत. त्यांनी असं दान केलय की त्यामुळे तीन जणांचे जीव वाचणार आहेत. त्यांनी तीन कुटुंबातील व्यक्तिंना उघड्यावर पडू दिलं नाही आणि म्हणूनच त्यांना उघड्यावर सोडणं योग्य होणार नाही त्यांचा विचार व्हायलाच हवा असं रमेश कदम आणि त्यांच्या १७ मित्रांना वाटतं.
सामाजिक जबाबदारीतून हे व्हायलाच हवे. असे झाल्यास समाज मनावर त्याचे सकारात्मक प्रतीबिंब ऊमटेल असं मत राजू सी. पाटील यांनी मांडलं आहे.
लोभे कुटुंबियांसारख्या कुटुंबांना आधी प्राधान्य द्यावे असं मासूम खान म्हणतात.
शासनाने किंवा ज्यांना अवयव बसवलेले आहेत त्याच्या पालकांनी प्रत्येकी किमान ०५ लाख रुपये अवयवदान करणार्‍या व्यक्तीच्या पालकाला द्यावेत व शासनाने त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरीस घ्यावे असे मला वाटते असं मनोज भिसे यांना वाटतं.
खरं तर अशी मागणी होण्या अगोदर सरकारने लोभे कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे जाहीर केलं पाहिजे असं अमोल पडीले-रेड्डी यांचं म्हणणं आहे.
गुरुजी तुम्ही ज्या गोष्टी मध्ये लक्ष्य देता तिथे 100% यश मिळते याचा मला अनुभव आहे लोभे परिवाराला न्याय तर मिळालाच पाहिजे असं बालाजी गवळी सांगतात.
........तात्पर्य लोभे कुटुंबाने जे औदार्य दाखवलं त्याचा सन्मान सरकारने करावा, सब के साथ सबका विकास करावा, नाही तर चाय पे चर्चा करताना, चाय थंड झाली की सगळेच थंड होते!
- रवींद्र जगताप 9922612300

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी