HOME   महत्वाच्या घडामोडी

उघडले कचर्‍याचे दार, विलासरावांच्या स्मृतीस्थळाचा वाद, आज सूर्यग्रहण, महात्मा फुलेंवर तीन भाषात चित्रपट, भारत-पाक युद्धाची शक्यता, गारपीटग्रस्तांना अपुरी मदत, .......१५ फेब्रुवारी २०१८

उघडले कचर्‍याचे दार, विलासरावांच्या स्मृतीस्थळाचा वाद, आज सूर्यग्रहण, महात्मा फुलेंवर तीन भाषात चित्रपट, भारत-पाक युद्धाची शक्यता, गारपीटग्रस्तांना अपुरी मदत, .......१५ फेब्रुवारी २०१८

* विलासरावांच्या स्मृतीस्थळावरुन लातूर जिल्हा परिषदेचे कामकाज ३० मिनिटे तहकूब
* विलासरावांच्या स्मृतीस्थळाचा प्रस्ताव पुन्हा सरकारकडे पाठवणार, जिल्हा परिषदेचा निर्णय
* लातुरच्या कचरा डेपोचे कुलूप पोलिसांनी पंचनामा करुन काढले
* थकित वीज बिलापोटी लातूर शहरातील पाणी पुरवठ्याच्या २४० जोडण्या तोडल्या, सार्वजनिक दिवाबत्तीची ३६० कनेक्शन्स बंद
* या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आज १५ फेब्रुवारीला, भारतात दिसणार नाही
* मुंबईतल्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या ब्रीच कॅंडी शाखेत तबल ११ हजार ३६० कोटींचा घोटाळा, हिरे व्यापार्‍यांवर आरोप
* अमेरिकेतील फ्लोरिडा प्रातांतील एका शाळेत गोळीबार १७ जणांचा मृत्यू
* सोहराबुद्दीन एन्कॉऊंटर प्रकरणातून बडे अधिकारी आणि नेते कसे सुटले? फक्त कनिष्ट अधिकारीच कसे अडकले? माजी न्यायमूर्ती अजय ठिपसे यांचा सवाल
* मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषातून महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर वर्षभरात चित्रपट, नामांकित-व्यावसायिक कंपन्या करणार निर्मिती
* देशाच्या सिमा सुरक्षांसाठी दिल्लीत खासदारांकडून महायज्ञ, गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडून रथयात्रेला हिरवा झेंडा
* भारत-पाक युद्ध होण्याची शक्यता, अमेरिकन गुप्तचरांचा इशारा, पाकिस्तानकडून सुरुवात होण्याची शक्यता
* गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना सरकारकडून तुटपुंजी मदत; कोरडवाहू शेतकर्‍यांना दोन हजार सातशे तर बागायतदारांना एकरी पाच हजार ४०० रुपयांची मदत
* गारपीट व अवकाळीमुळे भंडारा जिल्ह्यात ३०० पोपटांचा आणि ६४ बगळ्यांचा मृत्यू
* गारपीट नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी- धनंजय मुंडे
* कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी २५ हजार, बागायतीसाठी ४० हजार तर फळबागांसाठी ५० हजारांची मदत द्या- धनंजय मुंडे
* गारांनी अमरावती, वर्धा व नागपूर जिल्हय़ांतील ३५ ते ४० हजार हेक्टरवरील संत्री बागा केल्या उद्ध्वस्त
* गारपीट नुकसानभरपाईसाठी आंदोलन करणारे भाजप आमदार आशिष देशमुखांसह ५० शेतकऱ्यांवर गुन्हा
* औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानंतर बेस्ट कर्मचार्‍यांचा संप स्थगित
* जवाहरलाल नेहरु यांनी पाकिस्तान विरोधात मागितली होती संघाची मदत, उमा भारती यांचा दावा
* उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरला करण्याबाबत अनुकुलता, पुणे वकील संघाचे आज काम बंद आंदोलन
* सरकारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना २२ फेब्रुवारीला काढणार महामोर्चा
* धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर विखरणमधील १९९ प्रकल्पग्रस्तांच्या शेतीचं पुनर्मुल्यांकन करणार
* कांद्याचे भाव वाढल्याने उत्पादकात समाधान
* अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकार केंद्राकडे मागणार २०० कोटींची मदत
* तुकाराम मुंडे यांची बदली नाशिकला झाल्यानंतर त्यांनी पुण्यात असताना घेतलेले अनेक निर्णय बदलले
* व्हॅलेंटाईन डे निमित्त ठाण्यात महाविद्यालयीन तरुण तरुणींनी काढली अवयवदान रॅली, दोन हजार जणांनी दिले अर्ज भरुन
* भारतीय रेल्वे एक लाख जागांसाठी होणार भरती, दहावी आणि आयटीआय झालेल्यांसाठी पन्नास टक्क्यांहून अधिक जागा
* राज्यातील चारही कृषी विद्यापिठांचं मुल्यांकन करण्याची गरज, विद्यापिठांचं काम चिंताजनक- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
* मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपीटीने झाले ३०८ गावांमधील १० हजार ५२४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
* अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत- कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
* अपंग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक व दुर्लक्षित घटकांसाठी ११ ठिकाणी विशेष न्यायालये होणार स्थापन
* राज्य शासनाच्या महिला अधिकाऱ्यांना सासू-सासऱ्यांच्या आजारपणासाठी मिळणार बदली
* मुंबई येथे मराठी भाषा भवनाच्या उभारणीसाठी समिती स्थापण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
* विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठीच्या पुस्तकांत अश्लील वा आक्षेपार्ह मजकूर नसल्याचा विनोद तावडे यांचा दावा
‘बाल नचिकेता’ व ‘भगवान वेदव्यास’ या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा होता आरोप
* मंत्रालय आवारातील जाळी पाहण्यासाठी लोकांनी केली गर्दी
* एटीएमने बँक खात्यातील पैसे परस्पर काढून घेणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एकाला ताब्यात घेण्यात हिंगोली पोलिसांना यश
* ओव्हरटेक केल्याचा जाब विचारला, मुंबईत ओला कॅबचालकाची हत्या, तीनपैकी दोनजण ताब्यात
* शिटी वाजवली की लाखाची फौज तयार, आता सैन्य भरतीची गरज नाही- दिवाकर रावते यांचा सरसंघचालक भागवत यांना टोला
* रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार ग्रामस्थांच्या समस्यांसाठी आज उध्दव ठाकरे भेटणार मुख्यमंत्र्यांना
* श्रेयस तळपदे याने टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर पीडित मुलांसोबत साजरा केला व्हॅलेंटाइन डे
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या निषेधार्थ रामटेक येथे युवक काँग्रेसचे मुंडण
* नोटाबंदीतील हजार, पाचशेच्या शिल्लक नोटा बुडीत ठरविण्याचे रिझव्‍‌र्ह बँक आणि नाबार्डचे जिल्हा बँकांना निर्देश
* आम्हाला दहशत निर्माण करण्यासाठी शक्तीशाली बनायचे नाही, विश्वगुरू बनायचे आहे- गृहमंत्री राजनाथ सिंह
* बॉम्बस्फोट प्रकरणी हवा असलेला 'इंडियन मुजाहिद्दीन'चा अरिज खान उर्फ जुनैद याला अटक, पकडण्यासाठी होते १५ लाखांचे बक्षीस
* शहिदांचा कोणताही धर्म नसतो, त्यांच्या बलिदानाला धार्मिक रंग देत नाही- लेफ्टनंट जनरल देवराज अनबू
* सुंजवान हल्ल्यात शहीद झालेले पाचही जवान मुस्लिम असल्याची असदुद्दीन ओवेसींची होती माहिती
* नागालँडमध्ये सत्तेत आल्यास ख्रिश्चनांना 'जेरूसलेम'ची मोफत वारी घडवून आणण्याचं भाजपचं आश्वासन
* आपने दिल्लीत सत्तर वर्षांतील कामं अवघ्या तीन वर्षांतच मार्गी लावली - अरविंद केजरीवाल यांचा दावा, दिल्लीत आपला झाली तीन वर्ष पूर्ण
* नवी दिल्लीत शाओमी कंपनीचे रेडमी नोट ५, रेडमी नोट ५ प्रो दोन स्मार्टफोन लॉन्च
* मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीझ सईदच्या मदरसे आणि दवाखान्यावर पाकिस्तानची कारवाई
* प्रशिक्षित पॅथॉलॉजिस्ट नसलेल्या लॅबचे आरोग्य चाचण्यांचे अहवाल ग्राह्य धरले जाणार नाहीत- दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी
* बडोदा येथील ९१व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पराभूत उमेदवारांना निमंत्रण नाही
* एल्फिन्स्टन-परळ जोडपूल तसेच आंबिवली पादचारी पूल २० फेब्रुवारीपर्यंत सेवेत येण्याची शक्यता
* मुंबई व उपनगरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत होणार चार वर्षांत ०९.५ लाख परवडणारी घरे


Comments

Top