HOME   महत्वाच्या घडामोडी

दिवेगावकर नवे आयुक्त, नवे आयुक्त मुळचे लातुरचे, आंबेडकर-गांधीजींचे पुतळे सांभाळा, मनपाने भरले वीज बील.......०७०३१८

दिवेगावकर नवे आयुक्त, नवे आयुक्त मुळचे लातुरचे, आंबेडकर-गांधीजींचे पुतळे सांभाळा, मनपाने भरले वीज बील.......०७०३१८

* नवे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या नेमणुकीचा आदेशच अद्याप लातूर मनपाला मिळाला नाही!
* महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना खास संरक्षण द्या- लातूर जागरुक नागरिक मंचची मागणी
* लातुरच्या मनपा आयुक्तपदी कौस्तुभ दिवेगावकर, हंगे गेले
* कौस्तुभ दिवेगावकर लातुरचे, लातुरच्या उपयोगाचे, त्यांना सहकार्य करा- रवींद्र जगताप, जागरुक नागरिक मंच
* लातूर मनपाने भरले ४६ लाखांचे वीज बील, पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता
* आज मध्यरात्री लातुरात महिला सुरक्षा रॅली, दीड वाजता होणार समारोप, तृप्ती देसाईंची माहिती
* शनिवारी लातुरात ब्रम्हकुमारीज तर्फे युवा महोत्सवाचे आयोजन
* भांडूपमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर नर्तिका थिरकल्या
* चीनची संरक्षण यंत्रणा भारतापेक्षा चौपट शक्तीशाली
* गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादूपिंडावरील उपचारासाठी विमानाने अमेरिकेला रवाना
* नारायण राणे यांनी विधानभवनात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राज्यसभेवर जाण्याबाबत दोन दिवसात निर्णय
* क्रिकेटपटू मोहम्मद शमीची जिवे मारण्याची धमकी, पत्नी हसीनने टाकली फेसबुक पोस्ट
* दाऊदची काही अटींवर भारतात परतण्याची तयारी
* शरणागती पत्करण्याचा दाऊद इब्राहीमचा तथाकथित प्रस्ताव, शुद्ध बकवास- उज्वल निकम
* आ. प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याच्या निर्णयावर विधानसभेत जोरदार गोंधळ
* पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळा प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी संसदेत गदारोळ
* किसान सभेचा नाशिकहून निघालेला मोर्चा १२ मार्चला धडकणार विधी मंडळावर
* आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्यांना मिळणार पेन्शन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
* औरंगाबादमधील कचरा प्रश्न महिन्याभरात मार्गी लावणार- मुख्यमंत्री
* महापालिकांना कचरा टाकण्यासाठी जागा नाही, शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीच क्षेपणभूमी- मुख्यमंत्री
* डीएसकेंच्या गोठविलेल्या पावणे तीनशे खात्यात ४३ कोटी ०९ लाख, डीएसकेंच्या पैशाचा तपास सुरु
* सदस्य असताना आरोप नाही, मात्र मंत्री होताच आरोप झाले, एकही आरोप सिद्ध नाही, बदनामी करणार्‍यांवर कारवाई करा- एकनाथ खडसे
* विधिमंडळातील गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ- मुख्यमंत्री
* खोटे आरोप करणे, जबाबदारीपासून दूर पळणे हेच सरकारचे काम- काँग्रेसचे आनंद शर्मा
* अकरावी प्रवेश: गुणवत्तायादीतील विद्यार्थ्यानी अनुमोदन दिल्याशिवाय महाविद्यालयाला प्रवेशप्रकिया नाही
* शेती विकासाचा दर पोहोचला २२ टक्क्यावर, शेतीचे उत्पन्न ४० हजार कोटींने वाढले- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
* उत्पन्नवाढ आणि काटकसरीमुळे विकासकामांना भरीव निधी-महसूल मंत्री
* कचरा निर्गत, स्वच्छ पेय जल, रस्ते, शिक्षण, आरोग्यावर खर्च करण्यासाठी शासन कटिबद्ध- महसूल मंत्री
* भाजप एक एक राज्य जिंकत आहे, परंतु त्यांची अवस्था सिकंदरासारखी होणार, सिकंदराला राज्य करता आले नाही- धनंजय मुंडे
* पुणे महानगर परिवहन महामंडळाची ०८ मार्चपासून आठ मार्गांवर महिलांसाठी 'तेजस्विनी' बस सेवा
* पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास शहर राष्ट्रवादीच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाचा विरोध
* १० मार्चला सांगलीतील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट केंद्राचे उद्घाटन
* अवघ्या ६० रुपयांची लाच घेताना वर्धा येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी गजाआड
* नांदेड जिल्ह्यात शेतात जनावरांना चारायला नेणार्‍या विवाहितेवर बलात्कार, आरोपी फ़रार, गुन्हा दाखल
* छत्रपती शिवाजी विमानतळाजवळ इमारतींना उंचीविषयी नियमाबाह्य परवानगी, एसआयटीमार्फ़त चौकशी करा- उच्च न्यायालयात विनंती
* मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दरवर्षी ११० आर्थिक गुन्ह्यांची नोंद- माहितीच्या अधिकारात माहिती उघड
* पीएनबी घोटाळा: गीतांजली ग्रुपचे उपाध्यक्ष विपुल चितालिया यांना अटक, १७ मार्चपर्यंत दिली सीबीआय कोठडी
* पीएनबीचे तत्कालीन उपव्यवस्थापक गोकुलनाथ शेट्टी यांना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
* द्रविडी विचारवंत ईव्हीआर पेरियार यांच्या पुतळ्याची वेल्लोर येथे नासधूस
* सोनिया गांधी देणार सहकारी पक्षांच्या नेत्यांना १३ मार्चला जेवण
* कार्ती चिदंबरम यांची वाढवली कोठडी, ०९ मार्चला जामीन अर्जावर सुनावणी
* २०१९ मध्ये सत्तेवर आल्यास तामिळनाडूला विशेष दर्जा देणार- राहुल गांधी
* महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना 'भारतरत्न' द्या- खासदार सुप्रिया सुळे
* मराठीच्या अभिजात दर्जासाठी संसदेच्या आवारात सेना खासदारांची निदर्शने
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची १२ मार्चला वाराणसीला भेट
* महात्मा गांधी यांच्या हत्येचे प्रकरण पुन्हा सुरू करण्याबाबतच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून
* दोन महिन्यांत देशभरातील १०६ बिबट्यांनी गमावला प्राण- वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऑफ इंडियाचा अहवाल
* दलाई लामा १८ आणि १९ मार्चला वाराणसीच्या दौर्‍यावर
* सशक्त नागरिक आपल्या लोकशाहीचा सर्वात मजबूत स्तंभ, ०४ वर्षांपासून नागरिकांना सशक्त बनवण्यासाठी प्रयत्नशील- पंतप्रधान मोदी
* नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी नेफ्यू रियो यांची नियुक्ती, १६ मार्चपर्यंत सिद्ध करावे लागेल बहुमत
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत सेंट्रल इम्फर्मेशन कमिशनच्या इमारतीचे केले उद्घाटन
* टी-२० तिरंगी मालिका: सलामीच्या लढतीत श्रीलंकेने भारताचा ०५ गडी राखून केला पराभव
* रशियाचे कार्गो विमान कोसळून ३२ ठार


Comments

Top