HOME   महत्वाच्या घडामोडी

भागवत-फडणवीसांच्या गायी, बाथरुममध्ये बिबट्या, कर्जमाफीला मुदतवाढ, भिडे गुरुजींवर कर्नाटकात गुन्हा, टोमॅटोच्या शेतात शेळ्या......१६ एप्रिल १८

भागवत-फडणवीसांच्या गायी, बाथरुममध्ये बिबट्या, कर्जमाफीला मुदतवाढ, भिडे गुरुजींवर कर्नाटकात गुन्हा, टोमॅटोच्या शेतात शेळ्या......१६ एप्रिल १८

* लातुरच्या बस स्थानकात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे चुकीच्या प्रकारांना बसला आळा, दोन गुन्हे उघडकीस
* व्हीएस पॅंथर्सतर्फे आज आंबेडकर पार्कवर भीमगीतगायन
* लातुरचे एसटी कर्मचारी एक तारखेला विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर करणार उपोषण
* अर्थमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा इशारा
* लातूर जिल्ह्यातील ४४ पाणी प्रकल्प झाले आताच कोरडे
* विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातील होमगार्ड्स १७ एप्रिल रोजी काढणार मोर्चा
* आ. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी केले पदग्रहण
* मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, विजांनी घेतला आठजणांचा बळी
* उद्धव ठाकरे आले जपानहून भाजपा अर्थमंत्री मुनगंटीवार भेटीस आतूर, मागितली वेळ
* आज हवामान खात्याची दिल्लीत पत्रकार परिषद, मान्सूनचा अंदाज जाहीर होणार
* गडचिरोलीत अपघातात कृषी महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी ठार
* विशेष दर्जा मिळावा या मागणीसाठी आज आंध्रप्रदेशात राज्यव्यापी बंद
* कठुआ सामुहिक बलात्कार- खून प्रकरणी आजपासून सुनावणी
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून स्वीडन आणि युकेच्या ०५ दिवसांच्या दौऱ्यावर
* सरसकट दीड लाखाच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी ०१ मेपर्यंत मुदतवाढ
* पुणे येथे आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
* देशाच्या वायव्य व मध्य भागात पुढील चार दिवसांत वाढणार तापमान, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाचा चढणार पारा
* मालेगावमध्ये ४२ अंश सेल्सिअस तर जळगाव, परभणी, अकोला, अमरावती, चंद्रपूर व वर्धा येथे पाऱ्याने गाठली चाळीशी
* नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धरले धारेवर
* स्थानिकांचा विरोध असेल तर नाणार प्रकल्प होणार नाही असा शब्द देऊनही मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला
* मुख्यमंत्री खोटे बोलले व त्यांनी कोकणच्या जनतेला मूर्ख बनवले
* लोकांचा विरोध होत राहिला तर नाणार रिफायनरी गुजरातला जाईल अशी मुख्यमंत्र्यांनी धमकी दिली, ही कुणाची चमचेगिरी?
* संभाजी भिडेंसह सातजणांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा ठपका, बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा
* संभाजी भिडे गुरुजींनी महाराष्ट्र एकीकरणच्या उमेदवारांना विजयी करा, माजी आमदाराला जागा दाखवून द्या असे केले होते आवाहन
* कठुआ, उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितांना न्याय मिळण्यासाठी अशोक चव्हाण यांनी काढला ठाण्यात मेणबत्ती मोर्चा, मुंबईत आक्रोश मोर्चा
* सातारा जिल्ह्यात मांढरदेवी घाटात युवतीची गळा कापून हत्या
* मुंबईत २४ तासांत १४ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
* नागपूर येथे घरातील बाथरुममध्ये शिरला बिबट्या
* महाबळेश्वर येथील केट्स पॉईंटवर सांगलीच्या प्रेमी युगलांची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
* टोमॅटोचे भाव कोसळल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या शेतात वाजगाजत सोडल्या शेळ्या
* गाय एवढीच प्रिय आहे तर मोहन भागवत, मुख्यमंत्री गायी का पाळत नाहीत- भालचंद्र मुणगेकर
* भाजप जनाधार असलेले इतर पक्षातील तयार नेते विकत घेतो, चंद्रकांत पाटील पैशाचा पाऊसच पाडत आहेत- सेना खासदार गजानन किर्तीकर
* कॉंग्रेसबरोबर गेलो तरच विजय होऊ शकतो हे राजू शेट्टींनी ओळखले, सत्तेकडे कावळे धावतात तसे त्यांचे झाले आहे- गजानन किर्तीकर
* हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेना लढविणार
* विद्यार्थ्याने शाळेची फी भरली नसेल तर त्याचा निकाल रोखता येणार नाही- राज्य बाल हक्क आयोग
* केडगाव खूनप्रकरणात अटक केलेले आमदार संग्राम जगतापांसह चार जणांची पोलिस कोठडी आज संपणार
* मुंबईतील मेट्रो-४ प्रकल्पाचे ०१ हजार ४८ कोटीचे कंत्राट टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि चायना हार्बर कंपन्यांना
* अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी संघर्ष करावा लागला तरी तो करू- सरसंघचालक मोहन भागवत
* भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसह सर्व निवडणुका राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी संयुक्त लढेल- प्रफुल्ल पटेल
* सुरतमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, ८६ जखमांचे व्रण, मुलीचा मृत्यू
* वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू असताना तरुणीचा विनयभंग करणारा पोलिसांच्या ताब्यात
* राष्ट्रकुल स्पर्धा: भारताने २६ सुवर्ण, २० रौप्य व २० कांस्य पदकांची केली कमाई
* कर्बोदके आणि शर्करा यांच्या अतिसेवनाने डोके आणि मानेच्या कॅन्सरचा धोका- अमेरिकन संशोधकांचे मत


Comments

Top