HOME   महत्वाच्या घडामोडी

अल्पवयीन मुली गायब होण्याचे प्रमाण ०५ वर्षात १५ पट वाढले........१९ एप्रिल २०१८

शोभायात्रेचा खर्च वसतीगृहाला, महागाईतही सोन्याला उठाव, भेंडवळ म्हणतात पाऊस सामान्य, बलात्कारावर बोलले पंतप्रधान!

अल्पवयीन मुली गायब होण्याचे प्रमाण ०५ वर्षात १५ पट वाढले........१९ एप्रिल २०१८

* परशुराम जयंतीच्या शोभायात्रेचा खर्च वसतीगृहाला देण्याच लातुरात निर्णय
* बिटरगावच्या महिलांनी उन्हात दहा किलोमीटर चालत काढला दारुबंदीसाठी मोर्चा
* प्रचंड महाग होऊनही लातुराच्या सराफा बाजारात सोने खरेदीला जोरदार प्रतिसाद
* लातुरच्या अंजलीनगरातील १५ वर्षीय मुलीचा रात्रभर घरात डांबून लैंगिक छळ, आरोपीला अटक
* यंदा पाऊस सामान्य, दुष्काळ संभवत नाही, राजाही बदलणार नाही भेंडवळांची भविष्यवणी,
* मुंबईत ०५ वर्षात अल्पवयीन मुलींच्या गायब होण्याचे प्रमाण १५ पटीने वाढले
* उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौर्‍यावर, लोकसभा मतदारसंघांचा घेणार आढावा
* बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्तानं अमित शाह यांनी कर्नाटकात केला रोड शो
* मुंबईत भाजीपाला विकण्यासाठी २५ ठिकाणी जागा मिळणार
* औरंगाबादेतील कन्नड तालुक्यात तरुणाच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या
* मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता
* राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ०४ जुलैला नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय
* वेळेवर वेतन न देणार्‍या देशभरातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची नोटीस
* राज्यात साडेतीन वर्षांत ६० लाख शौचालये उभारली, राज्य हागणदारीमुक्त झाल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा
* शाईचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये २०, १००, २०० आणि ५०० च्या नोटांची छपाई मंदावली
* चंद्रपुरचा पारा चढला ४५ अंश, मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद
* पोलिस अधीक्षक कार्यालय हल्ला प्रकरणाशी संबंध नसलेल्यांना पोलिस पकडत आहेत, फडणवीस यांनी राजधर्म पाळावा- धनंजय मुंडे
* 'ई-आधार'साठी डिजिटल हस्ताक्षरयुक्त 'क्यूआर कोड'ची सुरुवात, आधारधारकाची माहिती होणार अपडेट
* नागपूर मेट्रो ०१ मार्च २०१९ पासून होणार सुरू
* मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद ताहीर मर्चंटचा मृत्यू
* दीड एकर शेती, तांत्रिक कारणांमुळे कर्जमाफी योजनेत समावेश न झालेल्या जामखेड तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या
* लोकलच्या दरवाजात लोंबकळत इतरांना डब्यात शिरू न देणाऱ्यांवर कडक कारवाई करा- खासदार कपिल पाटील
* राज्यातील खाजगी शिकवण्या व कोचिंग क्लासेससाठी येणार अधिनियम, स्पर्धा परीक्षा क्लासेसचाही समावेश करा- कोचिंग क्लासेस
* बलात्कार करणाऱ्यास तात्काळ कठोर शिक्षा देण्यासाठी देशात एक वर्षासाठी शरियत कायद्याची अंमलबजावणी करा- अबु असीम आझमी
* इनकम टॅक्स रिटर्न भरताना चूक झाली तर पगारदार कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
* देशभरात 'एटीएम'मध्ये खडखडाट, कर्नाटकात 'पैशांचा पूर', वेगवेगळ्या ठिकाणाहून ३१.५५ कोटींची रोकड केली जप्त
* कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरण: केरळमधील राज्यव्यापी बंदच्या वेळी ९०० जणांना केले स्थानबद्ध
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लंडनमध्ये झाले 'भारत की बात, सबके साथ' कार्यक्रमात भाषण
* पाकिस्तानला आम्ही सर्जिकल स्ट्राइकची माहिती दिली, त्यानंतर मीडियाला
* पंतप्रधान मुद्रा योजनेचा ११ कोटी लोकांनी लाभ घेतला
* वीज न पोहोचलेल्या १८ हजार गावांत वीज पोहोचविली, सव्वा कोटी कुटुंबांनी गॅसचे अनुदान सोडले
* बलात्कार हा समाजातील अनाचार, बलात्कार हा बलात्कार असतो त्यावरुन राजकारण करु नका – नरेंद्र मोदी
* बीसीसीआय आणि सहकारी असोसिएशनना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणा- लॉ कमिशनची शिफारस
* महिला पत्रकार ही माझ्या नातीसमान- राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचं गालाला हात लावल्याच्या वादावर स्पष्टीकरण
* पुणे आयपीएलला राज्य सरकारने पाणी देऊ नये- हायकोर्टाचे सरकारला आदेश
* पुण्याच्या गहुंजे स्टेडियमकडे रेनवॉटरचा ३२ दिवस पुरेल इतका पाणीसाठा, बाहेरुन पाणी घेण्याची गरज नाही- महाराष्ट्र क्रिकेट * असोसिएशन


Comments

Top