HOME   महत्वाच्या घडामोडी

दाऊदची संपत्ती जप्त करा, प्रत्येक मुलीच्या नावाने ११ हजार, पेट्रोलचा उच्चांक, ०१ मेला महाश्रमदान......२१ एप्रिल २०१८

लातुरात मूक मोर्चा, २३ ला लातूर बंद, १६७ पोलिसांच्या बदल्या, खेड्यात चला श्रमदानाला, महाभियोगावर ६४ सह्या, मोदी प्रभाव कमी...

दाऊदची संपत्ती जप्त करा, प्रत्येक मुलीच्या नावाने ११ हजार, पेट्रोलचा उच्चांक, ०१ मेला महाश्रमदान......२१ एप्रिल २०१८

* आज लातुरात पेट्रोल ८२.७१ रुपये
* असिफाला न्याय द्या: २३ एप्रिलल लातूर बंदची हाक
* कन्नाव, कथुआ घटनांच्या निषेधार्थ लातुरात निघाला मूक मोर्चा
* देवणी तालुक्यातील गुरधाळ येथे जलसंवर्धनासाठी श्रमदान करणार्‍यांना दाढी-कटींग मोफत
* ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, लातुरात मागणी
* लातुरच्या व्यापारी महासंघाने केला जिल्हाधिकार्‍यांचा सत्कार
* लातूर जिल्ह्यातील १६७ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या
* हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राची-यंत्रणेची महापौर सुरेश पवार यांनी केली पाहणी, दिल्या सूचना
* सोशल मिडीयावरुन धमकी मिळाल्याने लातुरच्या पत्रकारांनी केली पोलिसात तक्रार
* पानी फाऊंडेशन: महाराष्ट्र दिनी राज्यभर श्रमदानाची मोहीम- आमीर खान
* महाराष्ट्र दिनी शहरवासीयांनी मोठय़ा संख्येने जवळच्या खेडय़ात जाऊन श्रमदान करावे- आमीर खान
* पानी फाउंडेशनचे जलमित्र होऊन दुष्काळविरोधी प्रयत्नात जलमित्र म्हणून ०१ लाख लोकांची नोंदणी
* राज्याच्या तापमानात वाढ, पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा
* पेट्रोलच्या दरात मोठी वाढ, आज राज्यात साडेचार वर्षात सर्वात महाग पेट्रोल
* मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या प्रकल्पातील साठा झपाट्याने कमी, टंचाई शक्य
* सरन्यायाधिशाविरुद्ध महाभियोग, ६४ खासदारांच्या सह्या, मनमोहनसिंग मात्र दूर
* महाभियोगावरून काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर, इतर विरोधी पक्षांचाही महाभियोगाला विरोध
* जस्टीस लोया प्रकरणाची याचिका फेटाळल्याने विरोधक आक्रमक
* जगातील प्रभावशाली नेत्यात मोदींना स्थान नाही, टाईमचा
* सांगलीच्या ब्रम्हनाळ तलावात मगरीने लहान मुलाला ओढून नेले, शोध सुरु
* बीड येथे एका पोलिस ठाण्यात फौजदाराच्या वाढदिवसानिमित्त ठाण्याच्या परिसरातच दोन तास डीजेवर डान्स!
* ०१ मे पासून पाकिस्तानी राजनैतिक अधिकार्‍यांना अमेरिकेत प्रवेश बंदी
* अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद होणार
* राज्याच्या विधानपरिषदेच्या ०६ जागांसाठी २१ मे रोजी मतदान, मतमोजणी २४ मे रोजी
* वैजापूरमध्ये नववीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला १० वर्षे व दुसऱ्याला तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
* केडगाव दुहेरी हत्या: संदीप गुंजाळ, बाळासाहेब गिऱ्हे, पप्पू मोकळे या तिघांची होणार नार्को टेस्ट
* पानसरे, दाभोलकर यांच्या खुन्यांना भाजपा पाठीशी घालत आहे, निष्क्रिय भाजप सरकारच्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा-उमा पानसरे
* राष्ट्रीय महामार्गांवरील टोल भरता येणार मोबाइलवरून, मोबाइलला प्रीपेड वॉलेट, क्रेडिट कार्ड, बँकेचे खाते जोडल्यास मिळणार सुविधा
* नगर जिल्ह्यात राम शिंदे यांचा पीए म्हणून घेणारा निकटवर्तीय बापू बाचकरसह मनसेचे गजानन राशीनकरवर खंडणीचा गुन्हा दाखल
* वाळू ठेका चालविण्यासाठी १० लाखाची खंडणी नंदकुमार गागरे यांना बाचकर व राशीनकर यांनी मागितल्याची तक्रार
* शिवसेनेचे शहापूर उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या, मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड
* समाजात तेढ निर्माण होऊन लाभ भाजपाला होईल याची काळजी शासन घेते, भयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा- सचिन पायलट नांदेडमध्ये
* सांगलीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी रविवारी एका कार्यक्रमात येणार एकाच व्यासपीठावर
* खुल्या गटातील आर्थिक दुर्बल घटकांना वैद्यकीय शिक्षण शुल्कापैकी ५० टक्के रक्कम परत देणार- राज्य सरकार
* नागपूर-बुटीबोरी - तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण: संपादित होणाऱ्या जमिनीचा सरसकट मावेजा देणार- मुख्यमंत्री
* स्वबळावर लढणार, भाजपसोबत एक हजार एक टक्के युती नाही, संभाव्य नुकसानीमुळे भाजप घाबरलेला- रामदास कदम
* युती होणार नसल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा होईल हा दावाही चुकीचा- रामदास कदम औरंगाबादमध्ये
* मुंबईवर '२६/११' दहशतवादी हल्ल्यातील जुंदालवरील खटल्याच्या सुनावणीला उच्च न्यायालयाची ११ जूनपर्यंत स्थगिती
* दाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, बहिण हसीना पारकर, आई अमिना बीचीही होणार संपत्ती जप्त
* पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटक, केरळ भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यांसह गारपीटीचा इशारा
* सुरतमधील ०९ वर्षीय मुलीवर बलात्कार, हत्या: मुख्य आरोपीसह तीन जणांना राजस्थानमधून अटक
* पेन्शन धारकांना बँक खात्याचे तपशील आणि मोबाइल क्रमांक देणे झाले अनिवार्य
* कठुआ बलात्कार: मुलीवर मंदिरातच बलात्कार झाल्याचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल
* पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पत्रकारांवर हल्ला
* प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत दलित आणि मागासवर्गीय कुटुंबांना मोफत एलपीजी- केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, धर्मेंद्र प्रधान
* देशात जन्मणाऱ्या प्रत्येक नवजात मुलीच्या नावे ११ हजारची एफडी करण्याचा आरोग्याचे काम करणार्‍या 'ऑक्सी' कंपनीचा निर्णय
* कठुआतील बलात्काराच्या घटनेवर व्यंगचित्र काढल्याने पलक्कडमधील महिला चित्रकार दुर्गा मालठीच्या घरावर दगडफेक
* दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजिंदर सच्चर यांचं निधन
* २००२ मध्ये झालेल्या नरोदा पाटीया नरसंहार प्रकरणी अहमदाबाद उच्च न्यायालयाने बजरंग दलाच्या बाबू बजरंगीला सुनावली जन्मठेप
* जे व्हायला नको ते दिल्लीत घडत आहे, कोणतीच संस्था शुद्ध न ठेवण्याचा पण काही लोकांनी केला आहे- लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन
* दिल्लीत काय चाललं आहे ते आम्ही पाहू, अध्यक्ष आसल्याने विषय शेवटी माझ्याकडेच येतो, लोकांच्या आशीर्वादाने वादळं पार करू- सुमित्रा महाजन
* आयीएल: चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर ६४ धावांनी विजय


Comments

Top