HOME   महत्वाच्या घडामोडी

भाजपने काढून घेतला काश्मीर सरकारचा पाठिंबा, जिल्हाधिकार्‍यांनी घेतला सहावीचा वर्ग दत्तक, खासदारांचे मनपा शाळेला दहा लाख, भाऊजी झाले राज्यमंत्री! भिडेंचा आंबा-मुलींचा थांबा, मालवाहतूकदार संपावर, कोल्हापुरात पुजार्‍यांच्या मुलाखती.......१९ जून २०१८

भाजपने काढून घेतला काश्मीर सरकारचा पाठिंबा, जिल्हाधिकार्‍यांनी घेतला सहावीचा वर्ग दत्तक, खासदारांचे मनपा शाळेला दहा लाख, भाऊजी झाले राज्यमंत्री! भिडेंचा आंबा-मुलींचा थांबा, मालवाहतूकदार संपावर, कोल्हापुरात पुजार्‍यांच्या मुलाखती.......१९ जून २०१८

* काश्मिरातील मुफ्ती सरकारचा पाठिंबा भाजपने काढून घेतला
* लातुरच्या जिल्हाधिकार्‍यांनी मनपाच्या शाळा क्रमांक नऊमधील सहावीचा वर्ग घेतला दत्तक
* वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकर्‍यांनी स्विकारल्या भेट म्हणून वह्या, मनपाच्या शाळा क्रमांक नऊमध्ये केल्या वाटप
* लातुरचे खासदार सुनील गायकवाड या शाळेला देणार दहा लाख
* खासदार सुनील गायकवाड यांचा आज वाढदिवस
* भय्युजी महाराजांनी खरोखरीच आत्महत्या केली का? अनेक प्रश्नांचा जन्म
* संभाजी भि़डेंना वैद्यकीय विभागाने बजावली नोटीस; आंब्याच्या वक्त्यावर खुलासा करण्याचे आदेश
* आपल्या शेतातील आंबा खाल्ल्यास हमखास मुलगा होतो असे केले होते भिडे गुरुजींनी वक्तव्य
* मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप सुरु
* मुद्रा योजना अंतर्गत राज्यातील बेरोजगारांसाठी रोजगार मोहीम राबवणार
* केंद्रीय शिक्षक पात्रता परिक्षा सर्व प्रादेशिक भाषात घेणार
* तीन वर्षात मोठे संशोधन झाल्याने शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल- प्रकाश जावडेकर
* तूर आणि हरभरा खरेदी केंद्रं बंद झाल्याने शेतकर्‍यांना २५०० रुपयांची फरकाची रक्कम देण्याचा विचार
* १० वी, १२ वी पुरवणी परिक्षांसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २५ जून
* वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाला गती
* ऊस उत्पादकांप्रमाणे दूध उत्पादकांना्ही मदत द्यावी यासाठी केंद्राकडे प्रयत्न करणार: सदाभाऊ खोत
* यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार पुष्पा भावे यांना २६ जून रोजी प्रदान करणार
* कोल्हापुरात सर्व जातीच्या पगारी पुजार्‍यांच्या नेमणुकांसाठी आजपासून मुलाखती
* अरविंद केजरीवाल यांना शिवसेनेनेही दिला पाठिंबा
* दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया रुग्णालयात दखल
* कुणाला मंत्रीपद द्यायचं याचा विचार मुख्यमंत्र्यांनी परदेशातच केला- सुधीर मुनगंटीवार
* मनसेने केली कार्यकारिणीची फेररचना
* शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकरांना मिळाला राज्यमंत्र्याचा दर्जा
* यवतमाळ जिल्ह्यात अस्वलाने केला दोन शेतकर्‍यांवर हल्ला, एक गंभीर जखमी
* डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णी याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
* नागपूरच्या देना बॅंकेला १९ प्रकरणांमध्ये १०० कोटींना फसवले
* गौरी लंकेशच्या मारेकर्‍याला समोर आणल्यास तो पानसरेंचा मारेकरी आहे की नाही हे सांगू शकतो, साक्षीदाराला विश्वास
* मुंबईतल्या रेल्वेस्थानकांवर सुरु होणार मोबाईल चार्जिंगची सुविधा
* कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना
* एम्स एमबीबीएस प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार


Comments

Top