Latestnews

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेसाठीच्या वयोमर्यादेत वाढ

2016-12-17 13:37:27 5695 Views 0 Comments

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादेत वाढ करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. खुल्या वर्गासाठी ही वयोमर्यादा २८ वरून ३१ करण्यात आली आहे तर मागासवर्गीयांसाठी ३१ वरून ३४ करण्यात आली असल्याचे निवेदन महसूल मंत्री श्री. पाटील यांनी दिले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कुस्तीपटू विजय नथू चौधरी यांनी सलग तिस-यांदा महाराष्ट्र केसरी किताब प्राप्त केल्याबद्दल त्यांचा अभिनंदन प्रस्ताव विधानपरिषदेत एकमताने संमत करण्यात आला. सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा अभिनंदन प्रस्ताव मांडला. विजय चौधरी यांची कामगिरी अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गगार यावेळी श्री. पाटील यांनी काढले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सदस्य शरद रणपिसे यांनीही विजय चौधरी यांचे अभिनंदन केले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी